वकील महिलेची तक्रार घेण्यास कोंढवा पोलिसांकडून टाळाटाळ अखेर न्यायालयानेच दिले गुन्हा दखल करण्याचे आदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वकील महिलेची तक्रार घेण्यास
कोंढवा पोलिसांकडून टाळाटाळ

अखेर न्यायालयानेच दिले गुन्हा दखल करण्याचे आदेश
वकील महिलेची तक्रार घेण्यास कोंढवा पोलिसांकडून टाळाटाळ अखेर न्यायालयानेच दिले गुन्हा दखल करण्याचे आदेश

वकील महिलेची तक्रार घेण्यास कोंढवा पोलिसांकडून टाळाटाळ अखेर न्यायालयानेच दिले गुन्हा दखल करण्याचे आदेश

sakal_logo
By

पुणे, ता. ७ : वकील महिलेस वकीलपत्र सोडण्यासाठी दबाव टाकून, विनयभंग करत खंडणी मागितल्याची तक्रार घेण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली. अखेर महिला वकिलाने न्यायालयात धाव घेतल्यानंतर त्यांच्या खासगी तक्रारीवरून कोंढवा पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

वसीम इक्बाल खान (वय ३५), नदीम सय्यद (वय ३५), भरत जाधव (वय ५८) आणि अतिका नदीम सय्यद (वय ३२, सर्व रा. पिसोळी गाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणी अ‍ॅड. साजिद शाह, अ‍ॅड. अमित मोरे यांच्यामार्फत खासगी तक्रार दाखल करण्यात आली होती. अ‍ॅड. शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला वकील आहेत. त्यांच्या सोसायटीमधील गैरव्यवहारात सहभागी असलेल्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी सोसायटीतील नागरिकांनी तक्रारदार महिलेची कायदेशीर सल्लागार म्हणून नेमणूक केली होती. ही माहिती संशयित आरोपींना समजली. त्यानंतर त्यांनी तक्रारदार महिला व त्यांच्या परिवाराला मानसिक, शारीरिक त्रास देत कायदेशीर मदत न करण्याची धमकी त्यांना दिली. तक्रारदार महिला आरोपींच्या दबावाला बळी पडल्या नाहीत. त्यांच्यावर पाळत ठेवली जात असल्यामुळे त्यांनी याबाबत विचारणा केली तेव्हा एकाने तो एका गँगचा सदस्य असल्याचे सांगत हे प्रकरण सोडण्याची व तक्रारदार महिलेस त्यांचे अपहरण करण्याची धमकी दिली. हा सर्व प्रकार कोंढवा पोलिसांना सांगूनही त्यांनी कारवाई केली नाही. त्यानंतर १६ जानेवारीलाही एकाने त्यांना अपमानजनक व अश्लील शब्द वापरून त्यांचा विनयभंग केला. तसेच त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचेही न्यायालयीन तक्रारीत म्हटले होते. ९ फेब्रुवारीला त्यांच्या पतीलाही मारहाण करण्यात आली. फेसबुक व यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातूनही बदनामी केली. तसेच त्यांच्या घराबाहेरील सीसीटीव्ही तोडून टाकले, दरवाजा तोडून घरात घुसण्याचा प्रयत्न केल्याचे व पैसे मागत असल्याचे तक्रारीत म्हटले होते. या सर्व प्रकरणाची दखल घेऊन न्यायालयाने कोंढवा पोलिसांना या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. कॅन्टोन्मेंट न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सी. एन ओंडारे यांनी हे आदेश दिले आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Pct22b13255 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..