राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आळंदी देवस्थानाचे निमंत्रण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आळंदी देवस्थानाचे निमंत्रण
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आळंदी देवस्थानाचे निमंत्रण

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आळंदी देवस्थानाचे निमंत्रण

sakal_logo
By

पुणे, ता. १० : तीर्थक्षेत्र आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान समितीने समस्त वारकरी संप्रदायाच्या वतीने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना माऊलींच्या दर्शनासाठी येण्याचे निमंत्रण दिले. माऊलींच्या संजीवन समाधी सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्त राष्ट्रपतींनी डिसेंबरमध्ये आळंदीमध्ये यावे, असे निमंत्रण राष्ट्रपती भवन येथे घेतलेल्या सदिच्छा भेटीत समितीने दिले.

देवस्थानचे मुख्य विश्वस्त योगेश देसाई यांच्या हस्ते राष्ट्रपती मुर्मू यांना माऊलींची मूर्ती, ज्ञानेश्वरी आणि गाथा देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, तसेच योगी निरंजननाथ आणि उमेश महाराज बागडे उपस्थित होते. देसाई यांनी वारकरी संप्रदायाचे महत्त्व, माऊलींची समाधी, आषाढी पायी वारी आणि देवस्थानच्या विविध प्रकल्पांची छायाचित्रांसह माहिती राष्ट्रपतींना दिली. सुमारे ४० मिनिटांच्या या भेटीमध्ये राष्ट्रपतींनी वारकरी संप्रदायाचा इतिहास जाणून घेतला. वारकरी संप्रदायाच्या वतीने केलेला सत्कार म्हणजे साक्षात ज्ञानेश्वर महाराजांचा आशीर्वाद आहे, अशी भावना द्रौपदी मुर्मू यांनी यावेळी व्यक्त केली.

Web Title: Todays Latest Marathi News Pct22b13268 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..