सामान्यांसाठी वृक्षविषयक कायद्याची एकपानी ओळख | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सामान्यांसाठी वृक्षविषयक कायद्याची एकपानी ओळख
सामान्यांसाठी वृक्षविषयक कायद्याची एकपानी ओळख

सामान्यांसाठी वृक्षविषयक कायद्याची एकपानी ओळख

sakal_logo
By

जनसामान्यांची वृक्षविषयक कायद्यांसंबंधी जाण वाढावी, यासाठी पुण्यातील सत्थ्या नटराजन् यांनी अभिनव कल्पना राबवली आहे. संबंधित कायद्यातील ठळक मुद्दे एकपानी पत्रकात आटोपशीरपणे समाविष्ट करून त्याआधारे ते जनजागृती करतात.
- नीला शर्मा

वृक्ष संवर्धनासाठी काम करणारे नटराजन् म्हणाले, ‘‘या कामासाठी विविध संस्था-संघटनांशी मी सल्लागार या नात्याने जोडला गेलो आहे. पुण्यातील टेकड्या, माळरानं व रस्त्याच्या कडेला झाडं लावण्याच्या उद्देशाने अनेकजण येतात. बिया भिरकावणं किंवा रोप लावणं म्हणजे वृक्ष संवर्धन नाही. आपण लावलेल्या रोपाची नीट वाढ होण्यासाठी आवश्यक ते प्रयत्नही करणं गरजेचं असतं. लावलेलं एक किंवा अनेक रोपं जगवण्यासाठी जबाबदारी घ्यायचीही गरज असते. उपक्रम स्तुत्य असूनही काळजीपूर्वक रोपांची निगा राखली न गेल्यामुळे उद्दिष्ट साध्य होत नाही. पण, याबाबत सखोल विचार करणारे तरी कितीजण असतील. असं घडण्यापेक्षा वृक्ष जतन व संवर्धनाबाबत काय करायला हवं, या संदर्भात मी जनजागृती करतो.’’
महाराष्ट्र (नागरी क्षेत्रे) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम, १९७५ अन्वये सांगण्यात आलेल्या महत्त्वाच्या बाबी मी एका पानात बसवलेल्या आहेत. यातील मार्गदर्शक तत्त्वं लक्षात घेऊन व्यक्ती, समूह, संस्था, संघटना आदी घटकांनी वृक्ष संवर्धनात योगदान दिल्यास अनेक ठिकाणी हरित पट्टे दिसू शकतात. एखाद्या ठिकाणी असलेलं एखादं झाड अचानक कापलेल्या अवस्थेत दिसल्यास कुठे आणि कुणाकडे तक्रार करावी, याबाबतही बरेचजण मला माहिती विचारतात. मी या संदर्भात जनजागृतीसाठी आतापर्यंत शंभरच्या आसपास कार्यक्रम केले आहेत. शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांप्रमाणेच काही प्रभागांमधील सभा, बैठका, व्याख्यानं वगैरे माध्यमातून माहिती प्रसारित केली आहे. अधिकाधिक नागरिकांनी वृक्ष संवर्धनाबाबत सजग होण्याची गरज आहे.