‘नाट्य रंगभूमीच्या इतिहासाचे लघुचित्रपटात झाले जतन’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘नाट्य रंगभूमीच्या इतिहासाचे 
लघुचित्रपटात झाले जतन’
‘नाट्य रंगभूमीच्या इतिहासाचे लघुचित्रपटात झाले जतन’

‘नाट्य रंगभूमीच्या इतिहासाचे लघुचित्रपटात झाले जतन’

sakal_logo
By

पुणे, ता. २२ : शिलेदार कुटुंबाचे नाट्य क्षेत्रात मोठे योगदान आहे. अण्णासाहेब किर्लोस्कर यांचे संगीतनाट्य क्षेत्रातील योगदान खूप मोठे आहे. त्यांची आठवण यानिमित्ताने नव्या पिढीला होणार आहे. नाट्यब्रह्म या लघुचित्रपाटाच्या माध्यमातून संगीतनाट्य रंगभूमीच्या इतिहासाचे जतन झाले,’’ असल्याचे मत ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी रविवारी व्यक्त केले. 

भारतीय विद्या भवन आणि गंधर्वभूषण जयराम शिलेदार ट्रस्ट आणि संवाद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जयमाला शिलेदार यांच्या ९६ व्या जन्मदिनी अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्यावर आधारित ‘नाट्यब्रह्म’ या लघुचित्रपटाचे प्रकाशन मंगळवारी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. 
यावेळी लघुपटाच्या लेखिका आणि दिग्दर्शक दीप्ती भोगले, अभिनेते विजय गोखले, सुभाष सराफ, संवाद पुणेचे सुनील महाजन, नंदकुमार काकिर्डे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ‘नाट्यब्रह्म’हा लघुचित्रपट दाखविण्यात आला. 
अशोक सराफ म्हणाले, ‘‘पब्लिसिटीच्या जगात जुन्या गोष्टींकडे वेळ द्यायला कोणाकडे वेळ नाही आहे. मात्र, जुन्या गोष्टींची आठवण झाली पाहिजे. त्यासाठी हा लघुचित्रपट नक्कीच फायदेशीर ठरेल. संगीत नाटकात काम केले. मात्र, कधी संगीत गायले नाही. संगीत नाटक क्षेत्रात मी देखील सुरुवातीला लुडबूड केली आहे. परंतु, हे आपले क्षेत्र नाही, हे वेळीच ओळखले.’’
लघुपटाच्या लेखिका आणि दिग्दर्शक दीप्ती भोगले यांनी ‘नाट्यब्रह्म’ची निर्मिती बाबत माहिती दिली. अभिनेते गोखले आणि सुभाष सराफ यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. महाजन यांनी प्रास्ताविक केले.

Web Title: Todays Latest Marathi News Pct22b13337 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..