सिंहगड रस्त्याचा पर्यायी मार्ग वाहतुकीस खुला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिंहगड रस्त्याचा पर्यायी मार्ग वाहतुकीस खुला
सिंहगड रस्त्याचा पर्यायी मार्ग वाहतुकीस खुला

सिंहगड रस्त्याचा पर्यायी मार्ग वाहतुकीस खुला

sakal_logo
By

पुणे, ता. २९ : सिंहगड रस्त्याला पर्यायी मार्ग असलेला कॅनॉल रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. हा रस्ता आजपासून (ता. २९) वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे पर्वती जलकेंद्र ते थेट वडगाव येथील फन टाईम थिएटरपर्यंत विना सिग्नल प्रवास करता येणार आहे. हा रस्ता लवकर पूर्ण करावा यासाठी ''सकाळ''ने पाठपुरावा केला होता.

सिंहगड रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असल्याने उड्डाणपूल बांधण्याचे काम सुरू आहे. सध्या हा एकमेव रस्ता असल्याने नागरिकांना बराच त्रास सहन करावा लागत आहे. फन टाईम ते इनामदार चौक यादरम्यान कॅनॉल रस्ता उपलब्ध होता, पण तो पुढे पु. ल. देशपांडे उद्यानाच्या मागून पर्वती जलकेंद्रापर्यंत पूर्ण करणे आवश्यक होते. हे काम संपविण्यासाठी पालिकेच्या पथ विभागाला तब्बल एक वर्ष लागला आहे. अखेर हा रस्ता आज खुला करण्यात आल्याचे महापालिका प्रशासनाने कळविले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pct22b13391 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..