‘फर्ग्युसन’, ‘मॉडर्न’सह नऊ संघ अंतिम फेरीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘फर्ग्युसन’, ‘मॉडर्न’सह नऊ संघ अंतिम फेरीत
‘फर्ग्युसन’, ‘मॉडर्न’सह नऊ संघ अंतिम फेरीत

‘फर्ग्युसन’, ‘मॉडर्न’सह नऊ संघ अंतिम फेरीत

sakal_logo
By

पुणे, ता. २९ : फर्ग्युसन महाविद्यालय, मॉडर्न महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालयासह नऊ महाविद्यालयांच्या संघांनी पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. सोमवारी (ता. २९) प्राथमिक फेरी संपल्यानंतर रात्री उशीरा निकालाची घोषणा करण्यात आली. या नऊ संघांत आता यंदाचा कंरडक पटकावण्यासाठी चुरस रंगेल.

अंतिम फेरीत प्रवेश केलेल्या एकांकिकांमध्ये तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती या संघाची ‘भू भू’, फर्ग्युसन महाविद्यालय या संघाची ‘आद्य’, डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, आकुर्डी या संघाची ‘एक्स्पायरी डेट’, कमिन्स अभियांत्रिकी महाविद्यालय या संघाची ‘चाराणे’, पीआयसीटी महाविद्यालय या संघाची ‘कलिगमन’, मॉडर्न कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय, शिवाजीनगर या संघाची ‘गाभारा’, मॉडर्न महाविद्यालय, गणेशखिंड या संघाची ‘अहो, ऐकताय ना’, अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे या संघाची ‘ओंजळभर चंद्र’ आणि टिकाराम जगन्नाथ महाविद्यालय या संघाची ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटील’ या एकांकिकांचा समावेश आहे. १७ व १८ सप्टेंबर रोजी या संघांमध्ये सदाशिव पेठेतील भरत नाट्य मंदिर येथे अंतिम फेरी रंगेल.

अभिनय उत्तेजनार्थ पारितोषिके
नील देशपांडे (स. प. महाविद्यालय, पुणे), वैष्णवी नाईक (अण्णासाहेब मगर महाविद्यालय, पुणे), प्रद्युम गायकवाड (न्यू आर्ट्स, कॉमर्स महाविद्यालय, अहमदनगर), ओम चव्हाण (महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी सिनियर महाविद्यालय, पुणे), साक्षी परदेशी (आय. एम. सी. सी., पुणे), कोमल पाटील (ढोले पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, वाघोली), धीरज यादव (सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे), वैभव आघाव (श्रीमती काशीबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे), प्रज्ञा वाघमारे (टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे), स्वरुपा खालटकर (पिंपरी-चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय, पिंपरी चिंचवड)

दर्जा खालावलेले संघ
कावेरी कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, सिंबायोसिस कला व वाणिज्य महाविद्यालय, इंदिरा कॉलेज ऑफ कॉमर्स अॅण्ड सायन्स महाविद्यालय, ट्रिनीटी अॅकॅडमी ऑफ इंजिनीयरिंग, इंडिसर्च महाविद्यालय, पद्मभूषण वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, जयवंतराव सावंत अभियांत्रिकी महाविद्यालय, डॉ. डी. वाय. पाटील बी स्कूल आणि पुणे विद्यार्थी गृहाचे अभियांत्रिकी महाविद्यालय

Web Title: Todays Latest Marathi News Pct22b13392 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..