मध्यवर्ती भागात दुपारपासून ‘नो-एंट्री’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मध्यवर्ती भागात दुपारपासून ‘नो-एंट्री’
मध्यवर्ती भागात दुपारपासून ‘नो-एंट्री’

मध्यवर्ती भागात दुपारपासून ‘नो-एंट्री’

sakal_logo
By

पुणे, ता. ३१ : यंदाच्या गणेशोत्सवाला होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन वाहतूक शाखेने एक ते आठ सप्टेंबरदरम्यान शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये दुपारी तीन वाजल्यापासून आवश्यकतेनुसार वाहतूक बंद ठेवली आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी केले आहे.

• बंद रस्ते
- लक्ष्मी रस्त्यावरील हमजेखान चौक ते टिळक चौक
- छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील स. गो. बर्वे ते जेधे चौक
- बाजीराव रस्त्यावरील पूरम चौक ते अप्पा बळवंत चौक
- टिळक रस्त्यावरील मराठा चेंबर ते हिराबाग चौक
- अनंत बाळकृष्ण नाईक पथ (जगदीश गॅरेज उपरस्ता) ते टिळक रस्ता
- सणस रस्ता : गोटीराम भय्या चौक ते गोविंद हलवाई चौक

• पर्यायी मार्ग
- डुल्या मारुती चौक, दारूवाला पूल, अपोलो टॉकीज पाठीमागील मारणे रस्त्यावरून सिंचन भवन
- शाहीर अमर शेख चौक, कुंभारवेस चौक, म.न.पा. भवन पाठीमागील रस्त्याने जावे
- हमजेखान चौक डावीकडे वळून महाराणा प्रताप रस्त्याने सरळ घोरपडी पेठ पोलिस चौकीपुढे शंकर शेठ रस्त्याने जावे
- शिवाजीनगरवरून स्वारगेटकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांनी स. गो. बर्वे चौक, जंगली महाराज रस्ता, टिळक चौक रस्ता किंवा शास्त्री रस्त्याचा वापर करावा
- सिमला चौक-कामगार पुतळा चौक- शाहीर अमर शेख चौक, बोल्हाई चौकमार्गे नेहरू रस्त्याचा वापर करून स्वारगेटकडे जावे
- कुंभारवेस चौक-पवळे चौक, साततोटी चौक, योजना हॉटेल उजवीकडे वळून देवजी बाबा चौक, हमजेखान चौक, महाराणा प्रताप रस्तामार्गे घोरपडी पेठ पोलिस चौकी, घोरपडी पेठ उद्यान, झगडे आळी ते शंकर शेठ रस्ता वापरावा
- पूरम चौक, टिळक चौकातून उजवीकडे वळून केळकर रस्त्याने अप्पा बळवंत चौक असा वापरावा
- जेधे चौक, नेहरू स्टेडियम समोरील एकेरी मार्गाने जमनालाल बजाज पुतळा, उजवीकडे वळून पूरम चौक, हिराबाग. (पीएमपी बस व तीन चाकी रिक्षा वगळून सर्व प्रकारच्या वाहनांना येथे बंदी असेल.)
- गोटीराम भय्या चौक, गाडीखाना, सुभेदार तालीम, डावीकडे वळून कस्तुरे चौक, डावीकडे वळून गोविंद हलवाई चौक या रस्त्याचा वापर करावा
- वाहतुकीच्या परिस्थितीनुसार गाडगीळ पुतळ्यापर्यंत येणारी दुचाकी वाहने ही लालमहलपर्यंत सोडण्यात येतील. तेथून दुचाकी वाहनचालकांनी डावीकडे फडके हौद चौकाकडे किंवा उजवीकडील फुटका बुरूजकडून पुढे जावे

हेही वाचा: 'माझं मन इतकं चंचल की...', प्राजक्ताचं गणेशाला साकडं

• इथे असेल ‘नो-पार्किंग’
- शिवाजी रस्त्यावरील जिजामाता चौक ते गोटीराम भैया चौक
- मंडई ते शनिपार चौक
- बाजीराव रस्त्यावरील शनिपार ते फुटका बुरूजपर्यंत
- अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौकापर्यंत

• इथे असेल पार्किंग
विमलाबाई गरवारे कॉलेज, एच. व्ही. देसाई कॉलेज, मनपा विद्यालय, पुलाचीवाडी नदी किनारी, दारूवाला पूल ते खडीचे मैदान, काँग्रेस भवन मनपा रस्ता, व्होल्गा चौक ते मित्र मंडळ चौक, कॅनॉलच्या कडेस, पूरम चौक ते हॉटेल विश्व रस्त्याची डावी बाजू, गाडगीळ पुतळा ते कुंभारवेस चौक, सर्कस मैदान, टिळक पूल ते भिडे पूल नदी किनारी, नारायण पेठ हमालवाडा पार्किंग

Web Title: Todays Latest Marathi News Pct22b13407 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..