लक्ष्मी रस्त्यावर मिरवणूक काढायची परवानगीच्या याचिकेवर आज सुनावणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लक्ष्मी रस्त्यावर मिरवणूक काढायची परवानगीच्या याचिकेवर आज सुनावणी
लक्ष्मी रस्त्यावर मिरवणूक काढायची परवानगीच्या याचिकेवर आज सुनावणी

लक्ष्मी रस्त्यावर मिरवणूक काढायची परवानगीच्या याचिकेवर आज सुनावणी

sakal_logo
By

पुणे, ता. ५ : मानाच्या गणपतींची विसर्जन मिरवणुकीच्यावेळी लक्ष्मी रस्त्याचा वापर आधी करावा, ही परंपरा घटनेतील कलम १९ नुसार दिलेल्या मुक्तपणे संचार करण्याच्या स्वातंत्र्याचे उल्लंघन आहे, असे म्हणणे मांडणाऱ्या याचिकेवर आज (ता.६) उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
विसर्जन मिरवणुकांच्या वेळी पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावरून प्रथम मानाचे पाच गणपती मंडळे जातील व त्यानंतरच इतरांनी जावे हा रूढी-परंपरा व प्रथेचा भाग म्हणजे कायदा नाही. त्यामुळे इतर लहान गणपती मंडळांना विसर्जनासाठी लक्ष्मी रस्ता वापरण्यावर असणारी बंधने म्हणजे बेकायदेशीरता व संविधानातील कलम १९ नुसार असलेल्या संचार स्वातंत्र्याचे उल्लंघन आहे, असा आरोप करणारी याचिका बढाई समाज ट्रस्टचे शैलेश बढाई यांनी अ‍ॅड. असीम सरोदे यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pct22b13437 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..