‘पीएमपी’ घडविणार कास पठाराचे दर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PMPML Kas Plateau tourism travel
‘पीएमपी’ घडविणार कास पठाराचे दर्शन पर्यटन मंत्र्यांचे आदेश ; अधिकाऱ्यांनी केली कास पठाराची पाहणी

‘पीएमपी’ घडविणार कास पठाराचे दर्शन

पुणे : कास पठाराचे निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी आता पीएमपीची ई-बस उपलब्ध असण्याची दाट शक्यता आहे. कास पठाराचे सौंदर्य अबाधित राखण्यासाठी व प्रदूषण टाळण्यासाठी पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पीएमपी प्रशासनाला आदेश दिले आहे. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी पीएमपीचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कास पठारची पाहणी साताऱ्यात दखल झाले. सातारा ते कास पठार या मार्गावर पीएमपीची ई-बस सेवा सूर करण्याचा मानस आहे. लवकरच या बाबत अधिकृत निर्णय जाहीर होईल.

सातारा जवळचे कास पठार पाहण्यासाठी पर्यटकाची मोठी गर्दी असते. पर्यटकांच्या वाहनांमुळे कास पठारच्या निसर्ग सौंदर्याला बाधा पोहचत आहे. वाहनांमुळे वाढणारे प्रदूषण ही प्रशासना समोर डोकेदुखी ठरत आहे. हे टाळण्यासाठी राज्याचा पर्यटन विभागाने पीएमपी ची ई-बस सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव दिला आहे. खुद्द पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा ही सेवा सुरू करण्यास उत्सुक असल्याने पीएमपीला प्रशासनाला ताबडतोब पाहणी करून याचा अहवाल देण्यास सांगितला आहे. त्यानुसार मंगळवारी पीएमपीचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कास पठारकडे धाव घेतली. येथे सेवा देणे कितपत शक्य आहे. याबाबरचा अहवाल लवकर दिला जाईल. हे करीत सर्वात मोठा प्रश्न हा चार्जिंग स्टेशनचा असणार आहे. चार्जिंग स्टेशन मुळेच सिंहगडाची पीएमपी सेवा स्थगित झाली.

ज्येष्ठसाठी पीएमपीचे ‘बाप्पा दर्शन’बस
ज्येष्ठ नागरिकांना पुण्यातील प्रमुख आठ गणपतीचे दर्शन घेता यावे, या करिता पर्यटन विभाग, पुणे महापालिका व पीएमपीच्या वतीने मोफत ‘बाप्पा दर्शन’ बस सेवा सुरू करण्यात आली. यासाठी चार बस राखीव ठेवण्यात आले असून आता पर्यंत सुमारे ८०० ज्येष्ट नागरिकांनी याचा लाभ घेतला आहे. पर्यटन मंडळाच्या वतीने मोफत चहा, नाश्त्याची सोय करण्यात आली. या बस सेवेला चांगला प्रतिसाद मिळाला. बुधवारी याचा समारोप होणार आहे.

कास पठारला ई-बस सेवा सुरू करणे कितपत शक्य आहे. याची पाहणी करून वरिष्ठांना अहवाल सादर केला जाणार आहे. त्या नंतरच या बाबत निर्णय घेतला जाईल.
- दत्तात्रेय झेंडे, मुख्य वाहतूक व्यवस्थापक, पीएमपीएमएल, पुणे.

Web Title: Todays Latest Marathi News Pct22b13448 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..