आपत्कालीन वैद्यकीय मदत केंद्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आपत्कालीन वैद्यकीय मदत केंद्र
आपत्कालीन वैद्यकीय मदत केंद्र

आपत्कालीन वैद्यकीय मदत केंद्र

sakal_logo
By

पुणे, ता. ७ : पुणे पोलिस विघ्नहर्ता न्यास यांच्या वतीने गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीमध्ये ठिकठिकाणी आपत्कालीन वैद्यकीय मदत केंद्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही पुणे शहर पोलिस विघ्नहर्ता न्यासाने भाविकांच्या सोईसाठी आपत्कालीन वैद्यकीय सेवा देण्याचे नियोजन केले आहे. त्यामध्ये तज्ज्ञ डॉक्टर्स, रुग्णवाहिका, स्वयंसेवक यांचा समावेश असणार आहे. लक्ष्मी रस्त्यावरील बेलबाग चौक, बाजीराव रस्त्यावरील पूरम चौक, टिळक रस्ता, स. प. महाविद्यालय, टिळक चौक (अलका चित्रपट गृह), शनिवार वाडा या ठिकाणी वैद्यकीय सेवा सुरू राहणार आहे. तसेच दोन फिरत्या रुग्णवाहिका असणार आहेत. आपत्कालीन वैद्यकीय सेवेसाठी डॉ. मिलिंद भोई (९९७००७७७७३), डॉ. नंदकिशोर बोरसे (९४२२०३२६९६), डॉ. शंतनू जगदाळे (९०११९१६६०७), डॉ. कुणाल कामठे (९८९०६१६३६५), डॉ. नितीन बोरा (९८२२९६९६६१) व सदाशिव कुंदेन (९९२१५७४४९९) यांच्याशी संपर्क साधावा.

Web Title: Todays Latest Marathi News Pct22b13465 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..