चार भूखंड परत करण्याचा प्रस्ताव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चार भूखंड परत करण्याचा प्रस्ताव
चार भूखंड परत करण्याचा प्रस्ताव

चार भूखंड परत करण्याचा प्रस्ताव

sakal_logo
By

पुणे, ता. ७ : महापालिकेने पर्वती येथे नगररचना योजना (टीपी स्कीम) करण्यासाठी १९६३ मध्ये ताब्यात घेतलेल्या भूखंडांपैकी कोट्यवधी रुपये किंमत असलेले चार भूखंड परत करा, असे आदेश राज्य शासनाने महापालिकेला दिले आहेत. त्यानुसार महापालिकेच्या बांधकाम विभागाने हे चार भूखंड मूळ जागा मालकाला परत करण्यासाठीचा प्रस्ताव स्थायी समिती समोर ठेवला आहे.


पुणे पेठ पर्वती सर्व्हे क्रमांक १२०(अ), १२० (ब) येथील २७ एकर १३ गुंठे ही जागा नगररचना योजनेनुसार महापालिकेच्या ताब्यात आली होती. या जागेवर येथील विटभट्टीधारकांचे पुनर्वसन करण्यासाठी आराखडा तयार केला. ४० भूखंड दाखवून विटभट्टीधारकांचे खरेदी खत केले. ही जागा ताब्यात घेताना पालिकेने योग्य मोबदला दिला नाही, असा आरोप करत जागा मालक मधुकर राऊत यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने ७५ हजार रुपयांची नुकसान भरपाई दिली, पण ती राऊत यांनी नाकारली. त्यांनी पुन्हा एकदा न्यायालयात धाव घेतली पण त्यावर अजून निर्णय झालेला नाही.
महापालिकेने ताब्यात घेतलेल्या जागेवर पुनर्वसनानंतर चार भूखंड शिल्लक होते, त्यापैकी दोनवर झोपडपट्टी झालेली आहे. महापालिकेने हे चार भूखंड जागा मालकाला परत करण्यासंदर्भात राज्य शासनाकडे अभिप्राय मागवला होता. त्यावर राज्य शासनाने भूखंड परत करावेत, असा अभिप्राय दिला, हा अभिप्राय महापालिकेला मान्य नसल्याने त्यांनी पुन्हा एकदा राज्य शासनाकडे अभिप्राय मागितला. त्यावर शासनाने यापूर्वीच आपल्याला अभिप्राय दिला असून त्यानुसार कार्यवाही करावी असे सांगितले. त्यानुसार आता बांधकाम विभागाने हे चार भूखंड जागा मालकाला परत करण्यासाठीचा प्रस्ताव स्थायी समिती पुढे ठेवला आहे.


हे भूखंड परत करताना ते आहे त्या स्थितीत ताब्यात घेण्यात यावेत, न्यायालयाच्या अंतिम निकालास अधीन राहून हे भूखंड ताब्यात घ्यावेत. महापालिका तसेच राज्य शासनाविरोधात विविध न्यायालयांत दाखल केलेले दावे मिटवावेत, अशा अटी या प्रस्तावात नमूद केल्या आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Pct22b13467 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..