पिसोळीतील पेट्रोल पंपालगतच्या रस्त्याला ओढ्याचे स्वरूप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिसोळीतील पेट्रोल पंपालगतच्या रस्त्याला ओढ्याचे स्वरूप
पिसोळीतील पेट्रोल पंपालगतच्या रस्त्याला ओढ्याचे स्वरूप

पिसोळीतील पेट्रोल पंपालगतच्या रस्त्याला ओढ्याचे स्वरूप

sakal_logo
By

पुणे, ता. ११ : शहर आणि पिसोळी परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे खडी मशीन चौकातून उंड्री, पिसोळीकडे येणाऱ्या महामार्गालगत धर्मावत पेट्रोलपंपासून आत जाणाऱ्या रस्त्याला ओढ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे पिसोळी गावातील नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. तर अनेक नागरिक रस्त्यावरच पेट्रोल पंपाजवळ अडकून पडले.
रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून, अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहने बंद पडली. त्यामुळे नागरिक, वाहनचालकांना धक्का मारून वाहने बाहेर काढावी लागत आहेत. या रस्त्यावर अनेक खड्डे असून, नागरिकांना जीव धोक्यात घालून पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे. या संदर्भात स्थानिक नागरिकांनी महापालिका क्षेत्रीय कार्यालयात तक्रार करूनही या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम करण्यात आलेले नाही.

थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार, तरीही दुर्लक्षच
पाऊस पडल्यानंतर नवीन पिसोळी गावातील नागरिकांचा संपर्क तुटतो. या भागात अनेक इमारती नव्याने उभारलेल्या असून हजारो नागरिक या भागात राहतात. पिसोळी आता महापालिकेत समाविष्ट होऊनही अनेक महिने उलटूनही स्थानिक समस्यांकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दूरध्वनी करून या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत तक्रार केली होती. या घटनेला एक महिना उलटल्यानंतरही मुख्यमंत्री कार्यालय किंवा महापालिका क्षेत्रीय कार्यालयाकडून अद्याप लक्ष दिलेले नाही.

Web Title: Todays Latest Marathi News Pct22b13476 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..