शहर, परिसरात पुढील दोन दिवस ढगाळ वातावरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शहर, परिसरात पुढील 
दोन दिवस ढगाळ वातावरण
शहर, परिसरात पुढील दोन दिवस ढगाळ वातावरण

शहर, परिसरात पुढील दोन दिवस ढगाळ वातावरण

sakal_logo
By

पुणे, ता. २० : शहर व परिसरात पुढील दोन ते तीन दिवस ढगाळ वातावरण कायम राहणार आहे. त्यात पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.

शहरात मंगळवारी (ता. २०) दिवसभर ढगाळ वातावरण व पावसाच्या अत्यंत हलक्या सरींनी हजेरी लावली होती. शहरात १.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. दरम्यान हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील आठवडाभर अंशतः ढगाळ वातावरण कायम राहणार आहे. तर येत्या शुक्रवारपर्यंत (ता. २३) हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
राज्यात ही काही जिल्ह्यांमध्ये पावसाची हजेरी कायम आहे. तर बुधवारी (ता. २१) विदर्भाच्या पूर्व भागात पावसाचा जोर वाढण्याची चिन्हे आहेत. त्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. बंगालच्या उपसागरात सक्रिय असलेल्या कमी दाब क्षेत्रामुळे ही स्थिती पाहायला मिळत आहे.
सध्या मॉन्सूनने वायव्य भारतातून परतीचा प्रवास सुरू केला आहे. त्यात वायव्य बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्र सक्रिय असून या प्रणालीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. ही प्रणाली वायव्य दिशेने प्रवास करत असून येत्या गुरुवारपर्यंत (ता. २२) ती छत्तीसगड व ओडिशाच्या उत्तरेकडील जाण्याची शक्यता आहे. यामुळे पुढील तीन दिवस विदर्भातील तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र येथील काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. राज्यात मंगळवारी (ता. २०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली होती.

बुधवारी (ता.२१) या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट :

नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सोलापूर, सांगली, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, उस्मानाबाद.

Web Title: Todays Latest Marathi News Pct22b13558 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..