मेट्रोच्या कामासाठी येरवडा परिसरात वाहतुकीत बदल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मेट्रोच्या कामासाठी
येरवडा परिसरात
वाहतुकीत बदल
मेट्रोच्या कामासाठी येरवडा परिसरात वाहतुकीत बदल

मेट्रोच्या कामासाठी येरवडा परिसरात वाहतुकीत बदल

sakal_logo
By

पुणे, ता. ४ : मेट्रोच्या कामासाठी येरवड्यातील पर्णकुटी चौकात १४ ऑक्टोबरपर्यंत रात्री ११ ते पहाटे सहा या वेळेत वाहतूक बदल करण्यात येणार आहेत. त्यामुळे वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
येरवड्यातील पर्णकुटी चौकात मेट्रो मार्गिकेवर गर्डर (ढाचा) टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. येरवड्यातील सादलबाबा चौकाकडून पर्णकुटी चौकातून कोरेगाव पार्ककडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. ६ ते १४ ऑक्टोबर दरम्यान रात्री १ ते पहाटे सहा या वेळेत पर्णकुटी चौकातून कोरेगाव पार्क जाणाऱ्या वाहनांना मनाई करण्यात आली आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी केले आहे.
वाहनचालकांनी सादलबाबा चौक, तारकेश्वर चौक, पर्णकुटी चौकातून गुंजन चौकातून उजवीकडे वळून पर्णकुटी चौकात जावे. तेथून डावीकडे वळून वाहनचालकांनी कोरेगाव पार्ककडे जावे.