चुकवू नये असे काही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चुकवू नये असे काही
चुकवू नये असे काही

चुकवू नये असे काही

sakal_logo
By

१) स्वरपर्व
तालानुभूती फाउंडेशन, परिमल व प्रमोद चौधरी फाउंडेशन आणि विलास जावडेकर यांच्यातर्फे ‘स्वरपर्व’-पर्व नव्या दमाच्या आश्वासक स्वरांचे या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात पं. शिवकुमार शर्मा यांचे शिष्य डॉ. शंतनू गोखले यांचे संतूर वादन आणि पं. मिलिंद रायकर यांचे सुपुत्र व शिष्य यज्ञेश रायकर यांच्या व्हायोलिन वादनाचा आनंद पुणेकर रसिकांना घेता येणार आहे.

कधी : शुक्रवार (ता. ७)
केव्हा : सायंकाळी ६ वाजता
कुठे : बालशिक्षण प्रशालेचे एमईएस सभागृह, मयूर कॉलनी

२) हस्तकला व चित्र प्रदर्शन
समर्थ एक्सिबिशनतर्फे पेंटिंग्ज व हस्तकला वस्तूंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात कॉफी पेंटिंग, मंडला आर्ट, कॅनव्हास पेंटिंग, नाईफ पेंटिंग, अकॅरॅलीक पेंटिंग, वुडन आर्ट, बॉटल आर्ट आदी विविध प्रकारची चित्रे व वस्तू पाहायला मिळतील.

कधी : शुक्रवार (ता. ७) ते रविवार (ता. ९)
केव्हा : सकाळी ११ ते रात्री ७.३०
कुठे : दर्पण आर्ट गॅलरी, पत्रकार नगर रोड, विखे पाटील शाळे समोर

३) रूपांतर चित्र प्रदर्शन
ज्येष्ठ कवी वसंत आबाजी डहाके यांच्या कविता आणि चित्रे यांचा रसिकांना एकत्र आस्वाद घेता यावा, या उद्देशाने सुदर्शन कलादालनातर्फे डहाके यांच्या निवडक रेखाचित्रांचे रूपांतर हे चित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. चित्रकार सुधीर पटवर्धन यांच्या हस्ते शनिवारी (ता. ८) सायंकाळी ६ वाजता प्रदर्शनाचे उद्‍घाटन होणार आहे. तसेच, प्रदर्शनादरम्यान शनिवारी (ता. १५) ‘वसंत आबाजी डहाके यांच्या निवडक कविता’ या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ कादंबरीकार श्याम मनोहर आणि ज्येष्ठ कवी चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार आहे. उद्‍घाटनानंतर स्वतः डहाके आणि जयदीप मुजूमदार व प्राची रेगे या पुस्तकातील काही कवितांचे वाचन करतील.

कधी : शनिवार (ता. ८) ते रविवार (ता. १६)
केव्हा : सायंकाळी ५ ते ८
कुठे : सुदर्शन कलादालन, शनिवार पेठ

४) साद-प्रतिसाद चित्र प्रदर्शन
चित्रकार सुजाता धारप यांच्या साद-प्रतिसाद या चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्लायवूडवरील नवी सीरीज या प्रदर्शनात पाहायला मिळेल. शुक्रवारी (ता. ७) सायंकाळी प्रख्यात चित्रकार प्रभाकर कोलते यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्‍घाटन होणार आहे.

कधी : शनिवार (ता. ८) ते शुक्रवार (ता. २१)
केव्हा : सकाळी १०.३० ते संध्याकाळी ७.३०
कुठे : मिनिमल स्ट्रोक आर्ट गॅलरी, सह्याद्री फार्म्स, बाणेर रस्ता

५) जी. ए. जन्मशताब्दीनिमित्त विशेष कार्यक्रम
जी. ए. कुलकर्णी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त जी. ए. कुलकर्णी कुटुंबीय, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे आणि अक्षरधारा बुक गॅलरी यांच्यातर्फे विशेष सांगितीक व साहित्यिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी (ता. ८) गायिका अनुराधा कुबेर, अपर्णा केळकर आणि कौशिकी कलेधोणकर हे कलाकार जी. एं.च्या आवडत्या संमिश्र संगीताचा कार्यक्रम सादर आहेत. तर, रविवारी (ता. ९) जी. एं.च्या कथेतील स्त्री व्यक्तिरेखांवर केलेल्या विशेष अभ्यासाबद्दल डॉ. वीणा देव यांचा विशेष सत्कार होणार आहे. यावेळी जी. एं.चे विद्यार्थी चंद्रशेखर चिकमठ हे जी. एं. बद्दलचे अनुभव कथन करणार आहेत. तर, हैदराबाद येथील भावतरंग संस्थेतर्फे जी. एं.च्या ‘पराभव’ या कथेवर आधारित विजय नाईक लिखित व दिग्दर्शित एकांकिकेचे सादरीकरण होणार आहे.

कधी : शनिवार (ता. ८) व रविवार (ता. ९)
केव्हा : सायंकाळी ५ वाजता
कुठे : सांगितीक कार्यक्रम - एस. एम. जोशी सभागृह, नवी पेठ,
साहित्यिक कार्यक्रम - यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड

६) आयसीसीआरतर्फे मैफील
कौजागिरी पौर्णिमेनिमित्त भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या (आयसीसीआर) पुणे विभागीय कार्यालयाच्या होरायझन उपक्रमाअंतर्गत गायन, वादन आणि नृत्य मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांच्या ज्येष्ठ शिष्या आरती ठाकूर-कुंडलकर यांचे गायन, ज्येष्ठ बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरासिया यांचे शिष्य सुनील अवचट यांचे बासरीवादन होणार आहे. तर नृत्यगुरू डॉ. सुचेता चापेकर यांच्या शिष्या अरुंधती पटवर्धन (भरतनाट्यम), नृत्यगुरू योगिनी गांधी यांच्या शिष्या रसिका गुमास्ते (ओडिसी) आणि नृत्यगुरू शांभवी दांडकेर यांच्या शिष्या अस्मिता ठाकूर (कथक) यांची एकत्रित नृत्य प्रस्तुती होणार आहे.

कधी : रविवार (ता. ९)
केव्हा : सायंकाळी ५ वाजता
कुठे : भारतीय विद्या भवन, सेनापती बापट रस्ता