वयाच्या ८८ वर्षी गुडघे प्रत्यारोपण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वयाच्या ८८ वर्षी
गुडघे प्रत्यारोपण
वयाच्या ८८ वर्षी गुडघे प्रत्यारोपण

वयाच्या ८८ वर्षी गुडघे प्रत्यारोपण

sakal_logo
By

पुणे, ता. २५ : तब्बल ८८ वर्षांच्या कर्णबधिर महिलेवर दोन्ही गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया शहरात यशस्वीरीत्या करण्यात आली. ही महिला गेल्या १० वर्षांपासून संधिवाताने त्रस्त होती.
रुग्णाचा गुडघा सातत्याने दुखत होता. त्यांना हालचाल करता येत नव्हती. त्यांची अवस्था आणि वयाकडे पाहून अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. आनंद जाधव यांनी दोन टप्प्यामध्ये गुडघा प्रत्यारोपणचा निर्णय घेतला. पहिल्या टप्प्यात उजव्या गुडघ्याचे प्रत्यारोपण करण्यात आले. त्यानंतर तीन महिन्यांनी दुसरी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्याचे नियोजन केले.
या शस्त्रक्रियेमध्ये रुग्णाचे वय हे ८५ वर्षांहून अधिक होते. हे मुख्य आव्हान होतेच, पण, रुग्णाला मधुमेह आणि उच्च रक्तदाबही होता. ही गोष्ट जास्त धोकादायक ठरू शकते. त्याच बरोबर दोन्ही गुडघ्यांमध्ये संधीवात असल्यामुळे त्यांची हालचाल खूपच कमी असल्यामुळे त्यांच्या रोजच्या जीवनावरही परिणाम होत होता, त्यामुळे शस्त्रक्रियेचा निर्णय घेतल्याचीही स्पष्ट केले.
डॉ. जाधव म्हणाले, ‘‘रुग्णाचा मधुमेहावर आणि रक्तदाबावर योग्य नियंत्रण असल्यामुळे आम्ही ही प्रक्रिया चांगल्या प्रकारे करू शकलो. पण त्यांचे वय अधिक असल्यामुळे आम्ही धोका पत्करू शकत नव्हतो, म्हणूनच आम्ही ही सर्जरी तीन महिन्यांच्या अंतराने करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या टप्प्यातील सर्जरीला रुग्णाने चांगला प्रतिसाद दिला आणि त्यामुळे आम्हाला आता दुसऱ्या टप्प्यातील उपचारांसाठी योग्य पावले उचलणे शक्य झाले आहे.’’ बाणेर येथील मणिपाल रुग्णालयात ही शस्त्रक्रिया झाली.