सैन्यातील आधुनिकतेचे नगरमध्ये सादरीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सैन्यातील आधुनिकतेचे
नगरमध्ये सादरीकरण
सैन्यातील आधुनिकतेचे नगरमध्ये सादरीकरण

सैन्यातील आधुनिकतेचे नगरमध्ये सादरीकरण

sakal_logo
By

पुणे, ता. २८ : जागतिक पातळीवर बदलत असलेल्या युद्धाचे स्वरूप पाहता भारतीय संरक्षण क्षेत्रात ही आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग वाढत आहे. अशाच आधुनिक तंत्रज्ञान व प्रणालींचा वापर नगर येथील सैन्यदलाच्या आर्मर्ड कोअर सेंटर आणि स्कूल तसेच मेकॅनाइज्ड इनफन्ट्री कोअर सेंटर अँड स्कूलमध्ये वापरण्यात येत असून याचे प्रत्यक्ष सादरीकरण शुक्रवारी (ता. २८) करण्यात आले.
युद्धात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या रणगाड्यांच्या तुकडीला प्रशिक्षण देण्याचे कार्य आर्मर्ड कोअर सेंटर आणि स्कूल करते. दरम्यान बदलत्या युद्धनितीनुसर प्रशिक्षणात ही आधुनिकीकरण करण्यात येत असून यामध्ये आधुनिक सिम्युलेटर आणि आभासी तंत्रज्ञाद्वारे रणगाडा युद्धप्रणालीचे प्रशिक्षण दिले जात आहे. या सर्व आधुनिक रणगाडा प्रशिक्षण प्रणालीचे प्रात्यक्षिके दाखविण्यात आले. प्रत्यक्ष युद्ध भूमीचे अनुभव देणारे सिम्युलेटर आणि आभासी यंत्रणा आर्मर्ड कोअर सेंटरमध्ये उभारण्यात आली आहे. यामध्ये टी-९०, टी-७२ रणगाडे चालविणे, त्यांच्या दुरुस्तीचे कार्य तसेच रचना अशा सर्व गोष्टींचा समावेश आहे. अशा प्रकारच्या प्रशिक्षणासाठी मोठ्या संख्येने रणगाडे उपलब्ध करणे आव्हानात्मक असून, अधिकारी व जवानांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने या पद्धतीने प्रशिक्षण दिले जाते.
सध्या सेंटरमध्ये नव्या साधनांचा वापर करून प्रशिक्षण दिले जात आहे. तसेच जागतिक पातळीवर सुरू असलेल्या घडामोडींचा लष्कराच्या दृष्टीने अभ्यास करत प्रशिक्षण पद्धतीत बदल करत आहोत, अशी माहिती सेंटरच्या एका अधिकाऱ्याने दिली.

सेंटरबाबत थोडक्यात
आर्मर्ड कोअर सेंटर अँड स्कूलची स्थापना १९४८ मध्ये झाली. आर्मर्ड कोअर भरतीसाठी मूलभूत लष्करी प्रशिक्षण देणे. तसेच सर्व आर्मर्ड कोअरच्या अधिकारी व जवानांना यांत्रिक युद्धाच्या रणनीतिक आणि तांत्रिक पैलूंमध्ये प्रशिक्षित करण्याचे कार्य सेंटरद्वारे केले जाते.