युद्धभुमीवरील आधुनिक नकाशा प्रणाली विकसित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

युद्धभुमीवरील आधुनिक नकाशा प्रणाली विकसित
युद्धभुमीवरील आधुनिक नकाशा प्रणाली विकसित

युद्धभुमीवरील आधुनिक नकाशा प्रणाली विकसित

sakal_logo
By

पुणे, ता. २८ : युद्धभुमीवरील नेमकी परिस्थिती, उद्भवणाऱ्या समस्या, शत्रूची मारक क्षमता याचा विचार करून भौगोलिक नकाशाची प्रतिकृती करून आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी नगर येथील स्कूल ऑफ आर्मर्ड वॉरफेअरमध्ये आधुनिक सॉफ्टवेअरचा वापर केला जात आहे.

भारतात एका बाजूला बर्फाळ प्रदेश तर दुसरीकडे वाळवंट अशी भिन्न परिस्थिती असल्याने शत्रूवर लक्ष ठेऊन त्याचा निपटारा करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे समन्वय आवश्यक असतात. यादृष्टीने प्रत्यक्ष रणगडा युद्धभूमीवर जाताना दारूगोळा, इंधन आणि राशन या तीन गोष्टी महत्त्वपूर्ण समजल्या जातात. याबाबतची पूर्तता करून अत्याधुनिक सोयी साधनांचा वापर आर्मर्ड कोअरकडून केला जात असल्याची माहिती स्कूल ऑफ आर्मर्ड वॉरफेअरच्या अधिकाऱ्याने दिली. प्रत्यक्ष युद्धभूमीचे चित्र तयार करून नकाशा तयार केला जातो. प्रशिक्षणार्थी त्याबाबत चर्चा करून लढाईचा आराखडा तयार करतात आणि आधुनिक सॉफ्टवेअरवर अपलोड करतात. सॉफ्टवेअर आधारित नकाशाच नाही तर वेगवेगळ्या सॅण्ड मॉडेलच्या माध्यमातूनही प्रशिक्षण दिले जाते, असेही या अधिकाऱ्याने नमूद केले.

युद्ध परिस्थितीमध्ये रणगाड्यांची ओळख पटावी, तसेच शत्रूच्या रणगाड्यावर हल्ला करण्यासाठी सैनिकांना योग्य वेळेत माहिती पोचविणे अत्यंत गरजेचे असते. यासंदर्भाने रेडिओ सेट प्रणालीद्वारे संपर्क साधणे, माहिती पोहचविण्याच्या या कौशल्याची प्रशिक्षण नगर येथील आर्मर्ड कोर सेंटर अँड स्कूलच्या इलेक्ट्रॉनिक विंगद्वारे दिले जात आहे. प्रशिक्षणादरम्यान ‘रेडिओ टेली कम्युनिकेशन मार्क १’ चा वापर केला जात आहे.