श्री सद्‍गुरू शंकर महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त पालखी सोहळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्री सद्‍गुरू शंकर महाराजांच्या 
प्रकट दिनानिमित्त पालखी सोहळा
श्री सद्‍गुरू शंकर महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त पालखी सोहळा

श्री सद्‍गुरू शंकर महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त पालखी सोहळा

sakal_logo
By

धनकवडी, ता. १ : श्री सद्‍गुरू शंकर महाराज अन्न समिती ट्रस्टच्या वतीने शंकर महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त शंकर महाराज यांच्या पादुकांचा पायी पालखी सोहळा मंगळवारी आयोजित केला होता. धनकवडी गाव ते बालाजीनगर, भारती विद्यापीठ परिसर, तळजाई टेकडी परिसर, पद्मावती, चव्हाणनगर या भागात आणि शंकर महाराज यांच्या समाधी मठाच्या परिसरात नगरप्रदक्षिणा करून पालखी सोहळा पार पडला.

धनकवडी येथील श्री सद्‍गुरू शंकर महाराज समाधी मठाच्या प्रवेशद्वाराजवळ पायी पालखी सोहळ्याचा प्रारंभ झाला. फुलांची सजावट केलेल्या रथात विराजमान झालेल्या शंकर महाराजांच्या भव्य मूर्तीचे पूजन व आरती करून पालखी सोहळ्याची सुरुवात झाली. याचे नियोजन सद्‍गुरू शंकर महाराज अन्नछत्र समिती ट्रस्टचे अध्यक्ष राजाभाऊ रेवडे, पदाधिकारी प्रशांत सूर्यवंशी, प्रवीण पासलकर, निखिल वाघमारे, नीलेश कोटकर यांनी केले.

पालखी सोहळा नगरप्रदक्षिणेसाठी जात असताना ठिकठिकाणी रांगोळ्या काढून भाविकांनी सोहळ्याचे पुष्पवृष्टी आणि फटाक्यांची आतषबाजी, ढोल लेझीमच्या गजरात स्वागत केले. सोहळ्यात महिलांचा व युवकांचा मोठा सहभाग होता. या प्रसंगी अखिल मंडई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अण्णा थोरात, माजी महापौर दत्तात्रेय धनकवडे, आमदार भीमराव तापकीर, गौरव घुले, मयूर आहेर, मनोज देशपांडे, राजाभाऊ पासलकर आदी उपस्थित होते.