चीनकडे पाश्चात्त्य दृष्टिकोनातून पाहणे उपयुक्त नाही : गोखले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चीनकडे पाश्चात्त्य दृष्टिकोनातून
पाहणे उपयुक्त नाही : गोखले
चीनकडे पाश्चात्त्य दृष्टिकोनातून पाहणे उपयुक्त नाही : गोखले

चीनकडे पाश्चात्त्य दृष्टिकोनातून पाहणे उपयुक्त नाही : गोखले

sakal_logo
By

पुणे, ता. २ : ‘‘भारताचे लक्ष नेहमीच पाश्चिमात्य जगाकडे असते. परंतु चीनकडे पाश्चात्त्य दृष्टिकोनातून पाहणे आपल्या देशाला निश्चित उपयुक्त नाही,’’ असे माजी परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी येथे सांगितले.

‘सिंबायोसिस स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज’तर्फे गोखले यांच्या ‘आफ्टर तियानमेन - द राइज ऑफ चायना’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. सिंबायोसिसचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे होते. प्रकाशन कार्यक्रमानंतर पुस्तकावर चर्चा करण्यात आली. माजी राजदूत तलमीझ अहमद यांनी सूत्रसंचालन केले. प्र-कुलपती डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ. रजनी गुप्ते आणि संचालिका प्रा. शिवाली लवाले आदी या वेळी उपस्थित होते.

या प्रसंगी गोखले म्हणाले, ‘‘परराष्ट्र धोरणाकडे पाहण्याची एक पाश्चात्त्य दृष्टी आहे. मूल्ये, मानवी हक्क, संरक्षण यांवर ती प्रामुख्याने आधारित आहे. दुसरी चीनची दृष्टी आहे. जी पूर्णपणे ‘सामान्य समृद्धी’वर आधारित आहे. आपण एक देश म्हणून या दोन्हीपैकी कोणत्याही एका दृष्टिकोनाचा स्वीकार किंवा अवलंब करण्यापेक्षा आपल्या सभोवतालच्या गोष्टींकडे पाहण्यासाठी आपला स्वतःचा असा दृष्टिकोन विकसित करणे आवश्यक आहे.’’ भारताला तीन ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था १५ ट्रिलियनमध्ये विकसित करायची असेल, तर बाहेरील जगाकडे पाहण्याची गरज आहे. आंतरराष्ट्रीय संबंधांचे चांगले ज्ञान देशाला पुढे जाण्यास मदत करेल, असे गोखले यांनी स्पष्ट केले.