महिलेला मारहाण करणाऱ्या पोलिसाविरुद्ध अखेर गुन्हा पालकमंत्री पाटील यांनीही दिल्या होत्या कारवाईच्या सूचना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिलेला मारहाण करणाऱ्या
पोलिसाविरुद्ध अखेर गुन्हा 

पालकमंत्री पाटील यांनीही दिल्या होत्या कारवाईच्या सूचना
महिलेला मारहाण करणाऱ्या पोलिसाविरुद्ध अखेर गुन्हा पालकमंत्री पाटील यांनीही दिल्या होत्या कारवाईच्या सूचना

महिलेला मारहाण करणाऱ्या पोलिसाविरुद्ध अखेर गुन्हा पालकमंत्री पाटील यांनीही दिल्या होत्या कारवाईच्या सूचना

sakal_logo
By

पुणे, ता. १९ : रस्त्यात अडथळा होत असलेली दुचाकी काढण्यास सांगितल्याच्या रागातून महिलेस पोलिस चौकीत बोलावून जबर मारहाण करणाऱ्या पोलिसावर १५ दिवसांनंतर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कारवाई करण्याच्या सूचना पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना दिल्या होत्या.

राहुल शिंगे असे गुन्हा दाखल झालेल्या पोलिसाचे नाव आहे. या प्रकरणी ५० वर्षीय व्यापारी महिलेने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. शिंगे याने महिलेस मारहाण करण्याची घटना १९ फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास महात्मा फुले मंडई पोलिस चौकीत घडली होती. फिर्यादी महिलेचे महात्मा फुले मंडई पोलिस चौकी शेजारी दुकान आहे. तर शिंगे हा खडक पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. १९ फेब्रुवारी रोजी साध्या वेशातील शिंगे हा त्याच्या साथीदारांसह मंडई चौकीजवळ आला. त्याने त्याची दुचाकी फिर्यादीच्या दुकानासमोरील रस्त्यावर उभी केल्याने महिलेने त्यास दुचाकी बाजूला घेण्यास सांगितली, त्याने त्यांच्याशी हुज्जत घालत त्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर शिंगे याने महिलेस साहेबांनी बोलावले असल्याचे सांगत पोलिस चौकीत बोलावून महिलेस मारहाण केली. या मारहाणीत महिलेचा डोळा सुजला तसेच चेहरा आणि डोक्याला जबर मार लागला होता. यामुळे त्या बेशुद्धही झाल्या होत्या.

पालकमंत्री पाटील यांच्या पोलिस आयुक्तांना सूचना
पोलिस कर्मचाऱ्याने महिलेस पोलिस चौकीत मारहाण करण्याच्या घटनेनंतरही संबंधित पोलिस कर्मचाऱ्याविरुद्ध तक्रार घेण्यास विश्रामबाग पोलिसांनी टाळाटाळ केली. संबंधित प्रकरण पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता व पोलिस उपायुक्त डॉ. प्रियांका नारनवरे यांच्यापर्यंत गेले. अखेर १५ दिवसांनी शिंगे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणाची दखल घेत संबंधित पोलिस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.