दुचाकीवरून पडल्याने तरुणाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुचाकीवरून पडल्याने तरुणाचा मृत्यू
दुचाकीवरून पडल्याने तरुणाचा मृत्यू

दुचाकीवरून पडल्याने तरुणाचा मृत्यू

sakal_logo
By

पुणे, ता. ५ : रिक्षा आणि डंपरच्यामधून दुचाकी पुढे नेताना झालेल्या अपघात दुचाकीस्वार तरुणीच्या पाठीमागे बसलेल्या सतरा वर्षीय तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू झाला. ही घटना ताडीगुत्ता चौक ते जहाँगीरनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडली. दरम्यान, याप्रकरणी संबंधित तरुणी व डंपर चालकाविरुद्ध मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सूरज राजू हातेकर (वय १७) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस कर्मचारी दिनेश राणे यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून १५ वर्षीय तरुणीवर व डंपर चालकाविरुद्ध मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंधरा वर्षीय तरुणी व सूरज हातेकर असे दोघेजण गुरुवारी दुपारी चार वाजता दुचाकीवरून ताडीगुत्ता चौक ते जहाँगीर नगरकडे जाणाऱ्या मार्गाने निघाले होते. तरुणी दुचाकी चालवत होती तर सूरज हा पाठीमागे बसला होता. दरम्यान डंपर व रिक्षाच्यामधून दुचाकी काढताना ते दोघेही खाली पडले. त्यामध्ये तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तसेच डंपरचा देखील धक्का लागला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, मात्र गंभीर दुखापत झाल्याने तरुणाचा मृत्यू झाला.