डेक्कन जिमखाना परिसरात वाहतूक कोंडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डेक्कन जिमखाना परिसरात वाहतूक कोंडी
डेक्कन जिमखाना परिसरात वाहतूक कोंडी

डेक्कन जिमखाना परिसरात वाहतूक कोंडी

sakal_logo
By

पुणे, ता. ७ : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काढलेल्या मोर्चामुळे सोमवारी (ता. ७) डेक्कन जिमखाना परिसरात बराच वेळ वाहतूक कोंडीमध्ये अडकलेले वाहनचालक त्रस्त झाले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून साखर संकुलावर ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मोर्चाचे आयोजन केले होते.
दुपारी साडे बारा वाजता टिळक चौकातून या मोर्चाला सुरवात झाली. त्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून ऊस उत्पादक शेतकरी आपल्या विविध मागण्यांसाठी शिवाजीनगर येथील साखर संकुल येथे आले होते.
त्यामुळे डेक्कन जिमखाना, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, गोखले स्मारक चौक, खंडुजीबाबा चौक भागात वाहतूक कोंडी झाली. त्या कोंडीमध्ये कारचालक व दुचाकीस्वार अडकल्यामुळे त्रस्त झाले.
या मोर्चामध्ये शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने डेक्कन जिमखाना भागातील वाहतूक काही काळ बंद ठेवली.