सहा पोलिस उपायुक्तांच्या बदल्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सहा पोलिस उपायुक्तांच्या बदल्या
सहा पोलिस उपायुक्तांच्या बदल्या

सहा पोलिस उपायुक्तांच्या बदल्या

sakal_logo
By

पुणे, ता. ७ : राज्य सरकारच्या गृह विभागाने सोमवारी रात्री पोलिस उपायुक्तांच्या बदल्यांबाबत काढलेल्या आदेशानुसार शहर पोलिस दलातील सहा पोलिस उपायुक्तांच्या राज्याच्या विविध भागात बदली केली आहे. तर त्यांच्या जागी अन्य ठिकाणाहून सहा पोलिस अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

गृह विभागाने राज्यातील पोलिस उपायुक्त, पोलिस अधीक्षक, अपर पोलिस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्याचे सोमवारी रात्री आदेश काढले. त्यामध्ये १०४ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्याचे नमूद केले आहे. त्यात पुणे शहर पोलिस दलातील सहा पोलिस उपायुक्तांचा समावेश आहे

पुणे शहरात राज्याच्या विविध भागातून १६ पोलिस अधिकारी बदलून आले आहेत. त्यामध्ये सात पोलिस उपायुक्तांची नव्याने शहर पोलिस दलात नियुक्ती केली आहे. त्यामध्ये पोलिस उपायुक्त संदीप सिंह गिल, स्मार्तना. एस. पाटील, सुहेल शर्मा, शशिकांत बोराटे, विक्रांत देशमुख, अमोल झेंडे, विजय मगर या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

परिमंडळ एकच्या पोलिस उपायुक्त प्रियांका नारनवरे यांची नागपूर, आर्थिक व सायबर गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांची चंद्रपूर, परिमंडळ तीनच्या पोलिस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांची हिंगोली येथे नियुक्ती केली आहे. तर परिमंडळ पाचच्या पोलिस उपायुक्त नम्रता पाटील यांची मुंबई येथे नियुक्ती केली आहे. तर परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त सागर पाटील यांची अमरावती, पोलिस उपायुक्त विवेक पाटील यांची पिंपरी-चिंचवड, वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे यांची मुंबई येथील राज्य सुरक्षा महामंडळ येथे नियुक्ती केली आहे.

लाचलुचपत विभागाचे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे यांची बिनतारी संदेश विभागात, तर नाशिक येथील पोलिस उपायुक्त अमोल तांबे यांची पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अधीक्षक पदी, पुणे लोहमार्ग अधिक्षक पदी राजलक्ष्मी शिवणकर यांची नियुक्ती केली आहे. याबरोबरच प्रवीण पाटील, दीपक देवराज यांची पुणे येथील राज्य राखीव पोलिस दल, यांची आनंद भोईटे यांची पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या अतिरिक्त पोलिस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे लोहमार्गचे पोलिस अधीक्षक सदानंद वायसे-पाटील यांची मुंबई येथील राज्य गुप्तवार्ता येथे तर गुन्हे अन्वेषण विभागातील संभाजी कदम यांची अमरावती येथे पोलिस उपआयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे.