विद्यार्थिनी वसतिगृहातून इलेक्ट्रिकल वस्तू जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थिनी वसतिगृहातून
इलेक्ट्रिकल वस्तू जप्त
विद्यार्थिनी वसतिगृहातून इलेक्ट्रिकल वस्तू जप्त

विद्यार्थिनी वसतिगृहातून इलेक्ट्रिकल वस्तू जप्त

sakal_logo
By

पुणे, ता. १३ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहाची तपासणी करत प्रतिबंधित इलेक्ट्रिकल वस्तू जप्त करण्यात आल्या. वसतिगृह प्रशासनाने पूर्वसूचना न देता शुक्रवारी (ता. ११) रात्री केलेल्या झडतीमुळे विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण असल्याचा आरोप विद्यार्थी संघटनेने केला आहे.
थंडीच्या दिवसांत विद्यार्थिनींना वसतिगृहात पाणी गरम करण्याची कुठलीही सुविधा नाही, त्यामुळे गरम पाणी करण्यासाठी विद्यार्थिनी किटली, शेगडीसारख्या विजेवर चालणाऱ्या साधनांचा वापर करतात. यापूर्वी अनेक वेळा विद्यार्थिनींनी गरम पाणी मिळावे, अशी मागणी विद्यापीठाकडे केली आहे. मात्र यातील कुठलीही सुविधा विद्यापीठाने अद्याप दिलेली नाही, असा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केला आहे. सार्वजनिक सुविधा उपलब्ध केल्यानंतरच अशी कार्यवाही करावी, अशी मागणी अभाविपकडून कुलसचिव व कुलगुरू यांच्याकडे करण्यात आली. या वेळी अभाविपचे विद्यापीठ अध्यक्ष महादेव रंगा, जिल्हा सहसंयोजक श्रावणी मेस्त्री, मनाली सोनवणे आदी उपस्थित होते.
मुलींना वसतिगृहात कुठल्याही सुविधा नाहीत, थंडीच्या दिवसात मुलींनी गरम पाण्यासाठी कुठे जायचे? विद्यापीठ प्रशासनाने सुविधा पुरवणे अपेक्षित आहे; मात्र त्यावर ते कधीही बोलत नाहीत, असे विद्यार्थिनी मनाली सोनवणे हिने सांगितले.

वसतिगृहात आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. नियमाप्रमाणे प्रतिबंधित इलेक्ट्रिक वस्तू वापरणे चुकीचे असून, समज देण्यासाठी वसतिगृह प्रशासनाने कारवाई केली आहे. विद्यार्थिनींनी विनाकारण घाबरण्याचे कारण नाही.
- डॉ. व्ही. एल. मठे, वसतिगृह प्रमुख