रिपब्लिकन नेते भुजंगराव बडेकर यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रिपब्लिकन नेते भुजंगराव बडेकर यांचे निधन
रिपब्लिकन नेते भुजंगराव बडेकर यांचे निधन

रिपब्लिकन नेते भुजंगराव बडेकर यांचे निधन

sakal_logo
By

पुणे, ता. १३ ः रिपब्लिकन प्रेसिडियम पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष भुजंगराव बडेकर (वय ८४) यांचे निधन झाले. आंबेडकर चळवळीच्या अनेक आंदोलनांत त्यांनी निर्णायक नेतृत्व केले होते. पुणे रेल्वे स्थानकाबाहेरील किंग जॉर्जचा पुतळा हटवून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवण्याची मागणी असो की, अंलकार चौकातील कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या पुतळ्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या लढ्यातही त्यांचा सक्रिय सहभाग होता. २२ नोव्हेंबरला पुणे रेल्वे स्टेशनजवळील डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ सायंकाळी चार वाजता अभिवादन सभा आयोजित करण्यात आली असल्याचे जिल्हाध्यक्ष राज भोकरे यांनी सांगितले.

PNE22T04781