कर्वे रस्त्यावर तरुणीचा मोबाईल हिसकावला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कर्वे रस्त्यावर तरुणीचा मोबाईल हिसकावला
कर्वे रस्त्यावर तरुणीचा मोबाईल हिसकावला

कर्वे रस्त्यावर तरुणीचा मोबाईल हिसकावला

sakal_logo
By

पुणे, ता. १८ : दुचाकी वरून आलेल्या चोरट्यांनी रस्त्यावर थांबलेल्या तरुणीच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेल्याची घटना कोथरूड परिसरात घडली.

याप्रकरणी तरुणीने अलंकार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी तरुणी ही प्रभात रस्ता भागात राहायला आहे. दोन दिवसांपूर्वी तरुणी कोथरूड परिसरातील कोकण एक्स्प्रेस हॉटेलजवळ रिक्षाची वाट पाहत थांबली होती. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी तिच्या हातातील २० हजार रुपये किमतीचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेला. काही दिवसांपूर्वी याच परिसरातून रोहन नरके या तरुणाचाही मोबाईल हिसकावल्याची घटना घडली आहे.