मेफेड्रोन, चरसची विक्री करणाऱ्या दोघांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मेफेड्रोन, चरसची विक्री करणाऱ्या दोघांना अटक
मेफेड्रोन, चरसची विक्री करणाऱ्या दोघांना अटक

मेफेड्रोन, चरसची विक्री करणाऱ्या दोघांना अटक

sakal_logo
By

पुणे, ता. २० : मेफेड्रोन व चरसची विक्री करणाऱ्या दोघांना अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून मेफेड्रोन, चरस अमली पदार्थांसह मोबाईल, इतर ऐवज मिळून दोन लाख १५ हजारांचे साहित्य जप्त केले आहे.
आकाश महेंद्र ठाकर (वय २२, रा. आनंदनगर, हिंगणे), अनिकेत जनार्दन धांडेकर (वय २०, रा. सिंहगड रस्ता, हिंगणे खुर्द) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दोघेजण सिंहगड ठाण्याच्या हद्दीत मेफेड्रोन व चरसची तस्करी करीत असल्याची माहिती पोलिसांच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचून आकाशकडून ४८ हजारांचे चरस, मोबाईल व दुचाकी जप्त केली. अनिकेतकडून ८७ हजारांचे मेफेड्रोन, मोबाईल असा ऐवज जप्त केला.