चतू:शृंगी पोलिस ठाण्यातील महिला उपनिरीक्षकाचे निलंबन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चतू:शृंगी पोलिस ठाण्यातील महिला उपनिरीक्षकाचे निलंबन
चतू:शृंगी पोलिस ठाण्यातील महिला उपनिरीक्षकाचे निलंबन

चतू:शृंगी पोलिस ठाण्यातील महिला उपनिरीक्षकाचे निलंबन

sakal_logo
By

पुणे, ता. २२ : तरुणाविरोधात दिलेल्या तक्रारीची दखल न घेणाऱ्या चतु:शृंगी पोलिस ठाण्यातील महिला पोलिस उपनिरीक्षकास निलंबित करण्यात आले. तर वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची नियंत्रण कक्षात बदली केली.
वैशाली सूळ यांना सोमवारी निलंबित केले. पोलिस उपनिरीक्षक शामल पाटील यांची विशेष शाखेत तर पोलिस निरीक्षक राजकुमार वाघचवरे यांची नियंत्रण कक्षात बदली केली आहे. औंध येथील एका २६ वर्षीय तरुणीचा तिच्या ओळखीचा तरुण प्रतीक ढमाले याने खून केल्याची घटना नुकतीच घडली होती. याबाबतची तक्रार तरुणीच्या कुटुंबीयांनी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात दिली होती. तरुणी व प्रतीक यांचे प्रेमसंबंध होते. ते एकमेकांच्या नात्यातील होते. तरुणाची वर्तणूक चांगली नसल्याने तरुणीने त्याच्याशी संबंध तोडले होते. औंधमधील एका सोसायटीच्या पार्किंगमध्ये भेटण्याचे कारण देऊन त्याने तिला बोलावले. रागाच्या भरात प्रतीकने तिच्यावर चाकूने हल्ला करून खून केला होता. याप्रकरणी प्रतीक ढमाले, त्याचे वडील किसन ढमाले (वय ५०), प्रतीकचा मित्र रोहित (वय २७) यांच्यावर चतु:शृंगी ठाण्यात गुन्हा दाखल केला. दरम्यान, प्रतीकनेही आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती.
दरम्यान, प्रतीक हा तरुणीला त्रास देत असल्याची तक्रार तिच्या कुटुंबीयांनी दिली होती. पोलिसांनी वेगवेगळी कारणे देत तक्रारीनंतर योग्य ती कारवाई केली नाही, त्यामुळे तरुणीला प्राणास मुकावे लागले, असा ठपका संबंधित अधिकाऱ्यांवर ठेवला आहे. त्यानुसार, वैशाली सूळ यांचे सोमवारी निलंबन केले. पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक व अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर यांनी सोमवारी कारवाईचे आदेश दिले.