दहशतवाद्यांच्या घुसखोरीला बसणार लगाम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दहशतवाद्यांच्या घुसखोरीला बसणार लगाम
दहशतवाद्यांच्या घुसखोरीला बसणार लगाम

दहशतवाद्यांच्या घुसखोरीला बसणार लगाम

sakal_logo
By

पुणे, ता. २२ ः सीमावर्ती भागात भूमिगत बोगद्यामार्गे होत असलेल्या दशतवाद्यांच्या घुसखोरीला आता लगाम बसणार आहे. देशाच्या संरक्षणाचा पाया अधिक मजबूत करण्यासाठी आता नव्या प्रणालीचा वापर अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे देशाच्या सीमा संरक्षणाबरोबर जवानांना दहशतवाद्यांची घुसखोरी रोखणे अधिक सोपे होणार आहे.
‘भूमिगत बोगद्यांद्वारे घुसखोरी शोधण्यासाठी डीव्ही-हॉप आणि डीई-आयएस प्रणाली’ या विषयावरील संशोधनाच्या माध्यमातून अशा घुसखोरीला रोखण्याचा पर्याय सुचविण्यात आला आहे. या संशोधनाची माहिती नुकतीच ‘डिफेन्स सायन्स जर्नल’ या शोधपत्रिकेत प्रकाशित करण्यात आली आहे. दहशतवाद्यी हल्ले, घुसखोरी ही देशाच्या सौहार्द आणि शांततेवर परिणाम करते. त्यामुळे सीमावर्ती भागात भूमिगतरित्या होणाऱ्या घुसखोरीचा अचूक शोध घेण्यासाठी ‘डिस्टन्स व्हेक्टर-हॉप’ आणि ‘डिफरेंशियल इव्होल्यूशन’ आधारित इंटरसेप्शन प्रणालीची निर्मिती करण्यात आली आहे. या प्रणालीमुळे भूमिगत बोगद्यांमधून जर दहशतवादी देशाची सीमापार करण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांचा वेळेत व अचूकपणे शोध लाऊन त्यांचा सामना करणे शक्य होईल.

गरज का आहे?
लष्कराच्या दृष्टीने एखाद्या राष्ट्राची बाह्य सीमा सुरक्षित करणे ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी असते. यासाठी सातत्याने सीमावर्ती भागात तैनात राहून देखरेख ठेवण्याची भूमीच जवानांद्वारे पार पाडली जात आहे. सीमावर्ती भागात सुरक्षेसाठी मानवी गस्त आवश्‍यक असते. त्यात भूमिगत मार्गाद्वारे दहशतवाद्यांची घुसखोरी शोधणे सध्या सैन्यासामोर मोठे आव्हान आहे. बाह्य सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी वायरलेस सेन्सर नेटवर्कच्या माध्यमातून रिअल टाइम मॉनिटरिंग केली जाते. लष्कराद्वारे आतापर्यंत वापरण्यात येत असलेल्या सेन्सर प्रणालीची परिणामकारकता दिसून येत नाही. त्या तुलनेत डीव्ही-हॉप आणि डीई-आयएस प्रणालींचा वापर या अचूकरीत्या भूमिगत घुसखोरीला शोधण्यास परिणामकारक ठरत आहे.

असा होणार फायदा
- ‘डीव्ही-हॉप’द्वारे घुसखोरीची माहिती मिळते
- त्याचप्रमाणे दोन सेन्सरमधील समन्वय अचूक असल्याने माहितीतील त्रुटी कमी
- यामुळे माहितीच्या आधारे विश्लेषण करणे शक्य
- घुसखोरीच्या हालचाली पटकन व अचूक पद्धतीने शोधण्याची क्षमता विकसित
- दहशतवाद्यांकडून होणाऱ्या शास्त्रांच्या बेकायदेशीर तस्करीला आळा
- जवानांच्या जीवितहानीला टाळणे शक्य

या आहेत अडचणी?
- भूमिगत मार्गाद्वारे वाढत्या घुसखोरीचे आव्हान
- दीर्घ लांबीची सीमारेषेवर पाळत ठेवणे
- सीमावर्ती भागात मर्यादित जवानांची संख्या
- सेन्सर प्रणालीमध्ये होत असलेले बिघाड
- योग्य वेळेत अचूक माहिती न मिळणे