घरबसल्या मिळवा टपाल खात्याचे विवरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घरबसल्या मिळवा टपाल खात्याचे विवरण
घरबसल्या मिळवा टपाल खात्याचे विवरण

घरबसल्या मिळवा टपाल खात्याचे विवरण

sakal_logo
By

पुणे, ता. २३ : टपाल कार्यालयातर्फे ई-पासबुक सुविधा सुरू करण्यात आली आहे. टपाल कार्यालयाच्या खातेधारकांना खात्याचा तपशील मिळावा, यासाठी नेट बँकिंगची मोबाईलद्वारे सुविधा सुरू केली आहे.

ई-पासबुक सुविधा खातेधारक नोंदणीकृत मोबाईल क्रमांकाद्वारे वापरू शकतात. या सेवेसाठी शुल्क आकारले जाणार नाही. ई-पासबुक सेवेअंतर्गत खातेदार सर्व राष्ट्रीय बचत योजना खात्यांची शिल्लक पाहू शकतात. बचत खाते, सुकन्या समृद्धी खाते, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खात्यातील शेवटचे दहा व्यवहार प्रदर्शित केले जातील. मिनी स्टेटमेंट पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड केले जाऊ शकते.
ई-पासबुकची लिंक : इंडिया पोस्ट संकेतस्थळावर (https://www.indiapost.govin/Financial/Pages/Content/Post-Office- Saving-Schemes.aspx या लिंकवर) आणि www.ippbonline या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे. ही सुविधा भविष्यात ‘पोस्ट इन्फो’ या ॲपवरही उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती अधीक्षक डाकघर (पुणे ग्रामीण) बी. पी. एरंडे, यांनी दिली. सर्व खातेधारकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.