बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणीची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणीची मागणी
बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणीची मागणी

बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणीची मागणी

sakal_logo
By

पुणे, ता. २५ : मारणे टोळीची भीती दाखवून जीवे मारण्याची धमकी देत सराईत गुन्हेगाराने शहरातील एका बांधकाम व्यावसायिकाकडे एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी राकेश विठ्ठल मारणे याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मंगळवार पेठेतील एका ४७ वर्षीय बांधकाम व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे. ही घटना २६ जून ते नोव्हेंबर २०२२ या कालावधी सॅलिसबरी पार्क परिसरात घडली आहे. खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी सांगितले की, राकेश मारणे याने बांधकाम व्यावसायिकाला मारणे टोळीची भीती दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच तो एका राष्ट्रीय पक्षाचा कार्यकर्ता व आरटीआय कार्यकर्ता असल्याची देखील फिर्यादींना सांगत धमकावले होते. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.