
सिंहगड रस्ता परिसरात जुगार अड्ड्यावर छापा
पुणे, ता. ८ : सिंहगड रस्ता परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा विभागाने छापा घातला. तेथे २३ जणांविरुद्ध कारवाई करून त्यांच्याकडून एक लाख ३१ रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. सिंहगड रोड, परिसरात पत्र्याच्या शेडमध्ये काहीजण मटका जुगार खेळत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने तेथे छापा टाकला. तेथे २३ जण मटका, पंती पाकुळी सोरट जुगार पैसे लावून खेळत असल्याचे दिसून आले. त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल व जुगाराचे साहित्य असा एक लाख ३१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींना सिंहगड रोड पोलिस ठण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कुंभार, सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी पाटील, राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, अजय राणे, अण्णा माने, इरफान पठाण, हणमंत कांबळे, पुष्पेंद्र चव्हाण यांच्या पथकाने केली.