शहरासह राज्यातही ढगाळ वातावरण कायम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शहरासह राज्यातही ढगाळ वातावरण कायम
शहरासह राज्यातही ढगाळ वातावरण कायम

शहरासह राज्यातही ढगाळ वातावरण कायम

sakal_logo
By

पुणे, ता. १३ : शहरात मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरण पाहायला मिळाले. तर जिल्ह्यातील मुळशी भागात काही ठिकाणी पाऊस पडला. शहरात गुरुवारपर्यंत (ता. १५) वातावरण ढगाळ राहून हलक्या पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.

मंगळवारी शहरात ढगाळ वातावरण असेल तरी सकाळी काही प्रमाणात गारठा जाणवत होता. कमाल तापमानात झालेली काहीशी घट यामुळे हलकी थंडी जाणवली. मात्र, किमान तापमानात वाढ कायम होती. शहरात २०.१ अंश सेल्सिअस किमान तापमान होते. सरासरी पेक्षा तापमानात ८ अंशांनी वाढ झाली होती. मात्र, कमाल तापमानात सरासरीपेक्षा किंचित घट होती. पुढील दोन दिवस ही स्थिती अशीच कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यानंतर शहर व परिसरात पुन्हा निरभ्र आकाश आणि किमान तापमानाचा पारा घसरण्याची शक्यता आहे.
राज्यात ही ढगाळ वातावरण आणि मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.
दरम्यान राज्यात पुढील दोन दिवस मध्य महाराष्ट्र आणि कोकण येथील तुरळक भागात ढगाळ हवामानासह पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळानंतर आता अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. परिणामी कोकण व मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता आहे. दरम्यान कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव शुक्रवारनंतर (ता. १६) कमी होऊन त्यानंतर थंडीत वाढ होण्याची शक्यता आहे.

राज्यात मंगळवारी नीचांकी तापमान वाशीम येथे १५.२ अंश सेल्सिअस नोंदले गेले. बहुतांश भागात किमान तापमान २० अशांच्या पुढे आहे. त्यात उत्तर केरळ कर्नाटक किनाऱ्यापासून दक्षिणपूर्व आणि लगतच्या पूर्वमध्य अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून ते पश्चिम-वायव्येकडे सरकले आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र बुधवारी (ता. १४) सकाळपर्यंत भारताच्या किनाऱ्यापासून पश्चिमेकडे सरकण्याची चिन्हे आहेत.