प्रजासत्ताकदिनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा दुसरा टप्पा तीन टप्प्यांत आंदोलन करणार; येत्या मार्चमध्ये देशभर किसान मुक्ती मोर्चाचे आयोजन : | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रजासत्ताकदिनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा दुसरा टप्पा 

तीन टप्प्यांत आंदोलन करणार; येत्या मार्चमध्ये देशभर किसान मुक्ती मोर्चाचे आयोजन :
प्रजासत्ताकदिनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा दुसरा टप्पा तीन टप्प्यांत आंदोलन करणार; येत्या मार्चमध्ये देशभर किसान मुक्ती मोर्चाचे आयोजन :

प्रजासत्ताकदिनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा दुसरा टप्पा तीन टप्प्यांत आंदोलन करणार; येत्या मार्चमध्ये देशभर किसान मुक्ती मोर्चाचे आयोजन :

sakal_logo
By

पुणे, ता. २१ ः शेतीमालाला किमान हमीभाव देणारा कायदा करावा, नवीन वीज कायदा आणि आदिवासींचे हक्क नाकारणारा नवीन वन कायदा हे दोन्ही कायदे त्वरित मागे घ्यावेत, या प्रमुख तीन मागण्यांसह विविध मागण्यासाठी दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा दुसरा टप्पा येत्या प्रजासत्ताक दिनापासून (ता. २६) जानेवारी सुरू केला जाणार आहे. हे शेतकरी आंदोलन देशभर एकाचवेळी आणि तीन टप्प्यांत करण्याचा निर्णय अखिल भारतीय किसान महासभेच्या पुण्यातील बैठकीत घेतला आहे.

यानुसार पहिला टप्पा हा प्रजासत्ताकदिनी देशभर आंदोलन करण्याचा, दुसरा टप्पा हा फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर मोर्चा काढण्याचा आणि तिसरा टप्पा हा मार्चमध्ये देशभर किसान मुक्ती मोर्चा काढण्याचा असणार आहे. आंदोलनाच्या या तीन टप्प्यांबाबतचे प्रस्ताव पुण्यातील बैठकीत निश्चित केले आहेत. या प्रस्तावांवर येत्या २४ डिसेंबर रोजी होणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाच्या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. ही बैठक हरियाणातील कर्नाल येथे होणार असल्याचे अखिल भारतीय किसान महासभेचे नवनियुक्त राष्ट्रीय सचिव किशोर ढमाले यांनी सांगितले.

अखिल भारतीय किसान महासभेच्या राष्ट्रीय कार्यकारी मंडळाची दोन दिवशीय बैठक पुण्यात पार पडली. या बैठकीला राष्ट्रीय अध्यक्ष रुल्दुसिंग (पंजाब), महासचिव राजाराम सिंह (बिहार), जयप्रकाश (उत्तर प्रदेश), प्रेमसिंग गेहलोत (राजस्थान), फुलचंद घेवा (हरियाना), गुरनाम सिंग (पंजाब) हे अध्यक्ष मंडळातील सदस्य उपस्थित होते. महाराष्ट्रात श्रमिक शेतकरी संघटना व सत्यशोधक शेतकरी सभा या दोन संघटना अखिल भारतीय किसान महासभेशी संलग्नीत आहेत .या दोन्ही संघटनांच्या निमंत्रणावरून ही अखिल भारतीय किसान महासभेच्या कार्यकारी मंडळाची बैठक पुणे महापालिकेच्या कामगार युनियनच्या मदतीने पुणे शहरात आयोजित केली होती.

राष्ट्रीय उपाध्यक्ष, सचिवांची निवड
अखिल भारतीय किसान महासभेचा चौथा राष्ट्रीय मेळावा पार पडल्यानंतरची या सभेची पहिली बैठक ही पुण्यात घेतली. या बैठकीत किसान महासभेच्या नऊ राष्ट्रीय उपाध्यक्षांची आणि १३ सचिवांची निवड केली. राष्ट्रीय उपाध्यक्षांमध्ये जय प्रकाश नारायण, प्रेम सिंह गेहलोत, सुभाष काकुस्ते, फुलचंद ढेवा,अरुण सिंह, मंजू प्रकाश, बी.एन. सिंह, शिव सागर शर्मा आणि कार्तिक पाल यांचा समावेश आहे.


किसान महासभेवर किशोर ढमाले, काकुस्ते, बावके
अखिल भारतीय किसान महासभेच्या कार्यकारिणीत महाराष्ट्रातील पाच जणांची निवड झाली आहे. यापैकी एक राष्ट्रीय उपाध्यक्ष, दोन राष्ट्रीय सचिव आणि दोन कार्यकारिणी सदस्यांचा समावेश आहे. यामध्ये श्रमिक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड सुभाष काकुस्ते (राष्ट्रीय उपाध्यक्ष), सत्यशोधक शेतकरी सभेचे नेते किशोर ढमाले आणि श्रमिक शेतकरी संघटनेचे राजेंद्र बावके (दोघेही राष्ट्रीय सचिव) आणि रामसिंग गावित व करणसिंग कोकणी (कार्यकारिणी वरिष्ठ प्रतिनिधी) आदींचा समावेश आहे.