भांडणे सोडविल्‍यावरून एकावर तीक्ष्ण शस्त्राने वार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भांडणे सोडविल्‍यावरून
एकावर तीक्ष्ण शस्त्राने वार
भांडणे सोडविल्‍यावरून एकावर तीक्ष्ण शस्त्राने वार

भांडणे सोडविल्‍यावरून एकावर तीक्ष्ण शस्त्राने वार

sakal_logo
By

पुणे, ता. २५ : मध्यस्थी करून भांडणे सोडविल्याच्या रागातून तिघांनी एका व्यक्तीवर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. ही घटना येरवडा परिसरात घडली.

गणेश भारतीनाथ सदभैय्या, नीतेश सुनील सदभैय्या, शुभम जयवंत बावरी (तिघेही रा. कतारवाडी, येरवडा) यांच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल बाबू सदभैय्या (वय ३५, रा. कतारवाडी, येरवडा) याने याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

संशयित हे फिर्यादी विशाल यांच्या घराशेजारी राहण्यास असून, ते एकमेकांचे नातेवाईकही आहेत. गणेश याचे वडील भारतीनाथ यांचा महेंद्र बावरी यांच्याशी वाद झाला होता. त्या वेळी विशालने भांडणात मध्यस्थी करून भांडणे सोडविली होती. विशालने मध्यस्थी केल्याने गणेश त्याच्यावर चिडला होता. दरम्यान, संशयित दोन दिवसांपूर्वी विशाल याच्या घरात शिरले. ‘तुझ्यामुळे आमच्या वडिलांना मान खाली घालावी लागली,’ अशी दमबाजी करीत त्यांनी विशालवर कोयत्याने वार केले. त्यावेळी विशालची पत्नी व आईने भांडणात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आरोपींनी त्यांच्यावर कोयता उगारून दहशत पसरवीत दोघींना मारहाण केली. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक सत्यवान गेंड करत आहेत.
----