लोहगाव भागात भरदिवसा घरफोडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लोहगाव भागात भरदिवसा घरफोडी
लोहगाव भागात भरदिवसा घरफोडी

लोहगाव भागात भरदिवसा घरफोडी

sakal_logo
By

पुणे, ता. २५ : लोहगाव परिसरात चोरट्यांनी भरदिवसा सदनिकेचे कुलूप तोडून रोकड, सोन्याचे दागिने असा तीन लाख १५ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली.

याप्रकरणी एका महिलेने विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला वडगाव शिंदे रस्त्यावरील ओंकार कॉलनीत राहतात. फिर्यादी महिला आणि कुटुंबीय सकाळी साडेआठच्या सुमारास सदनिका बंद करुन बाहेर पडले असता चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून रोकड आणि सोन्याचे दागिने लांबविले. दुपारी दीडच्या सुमारास महिला व कुटुंबीय घरी परतल्यावर घरफोडी झाल्याचा प्रकार निदर्शनास आला. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक आर. एस. डावरे करीत आहेत.