आयएनएस शिवाजीच्या ९४ व्या तुकडीचा दीक्षान्त सोहळा उत्साहात अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे अधिकारी प्रशिक्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आयएनएस शिवाजीच्या ९४ व्या
तुकडीचा दीक्षान्त सोहळा उत्साहात

अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे अधिकारी प्रशिक्षण
आयएनएस शिवाजीच्या ९४ व्या तुकडीचा दीक्षान्त सोहळा उत्साहात अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे अधिकारी प्रशिक्षण

आयएनएस शिवाजीच्या ९४ व्या तुकडीचा दीक्षान्त सोहळा उत्साहात अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे अधिकारी प्रशिक्षण

sakal_logo
By

पुणे, ता. ३० : भारतीय नौदलाचे लोणावळा येथील सागरी अभियांत्रिकी प्रशिक्षण संस्थेचा ९४ व्या सागरी अभियांत्रिकी विशेष अभ्यासक्रम (एमईएससी) तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा शुक्रवारी (ता. ३०) उत्साहात पार पडला. मुंबईच्या नौदल प्रकल्पाचे महासंचालक व्हाइस अ‍ॅडमिरल आर. स्वामीनाथन यांनी दीक्षांत संचलनाची पाहणी केली.
या वेळी श्रीलंकेचे कमोडोर रोहन जोसेफ उपस्थित होते. या ९४ व्या तुकडीतील ५५ अधिकारी प्रशिक्षणार्थ्यांनी १०५ आठवड्यांचे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले. यामध्ये भारतीय नौदलाचे ४० तर, श्रीलंकेच्या नौदलातील १५ अधिकारी प्रशिक्षणार्थ्यांचा समावेश होता. दरम्यान, प्रशिक्षण पूर्ण केलेले अधिकारी भारतीय नौदलाच्या युद्धनौका आणि किनाऱ्यावरील आस्थापनांवर विविध जबाबदाऱ्या पार पाडतील. आयएनएस शिवाजीमध्ये भारतासह मित्र देशातील नौदलाच्या प्रशिक्षणार्थ्यांना ही सागरी अभियांत्रिकीचे प्रशिक्षण देण्यात येते. या माध्यमातून मित्र देशाशी संबंध अधिक दृढ करण्यावर भर दिला जातो.
दीक्षांत संचलन सोहळ्यात प्रशिक्षणादरम्यान उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना व्हाइस अ‍ॅडमिरल स्वामीनाथन यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये सर्वोत्कृष्ट अष्टपैलू अधिकारी म्हणून लेफ्टनंट जेसिन अ‍ॅलेक्स यांना ‘हॅमर’ पुरस्काराने गौरविण्यात आले. शैक्षणिक गुणवत्तेच्या आधारे प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल लेफ्टनंट एम. मोहन यांना गौरविण्यात आले. तर सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय अधिकाऱ्याचे पारितोषिक श्रीलंका नौदलाचे लेफ्टनंट धनसेकरा यांना प्रदान करण्यात आले.