Fri, Jan 27, 2023

गुन्हेगारांवर कठोर कारवाई करा : पालकमंत्री
गुन्हेगारांवर कठोर कारवाई करा : पालकमंत्री
Published on : 4 January 2023, 5:45 am
गुन्हेगारांवर कठोर कारवाई करा : पालकमंत्री
पुणे, ता. ४ : शहरात कोयते हातात घेऊन दहशत माजविणाऱ्या गुंडांच्या विरोधात कठोर कारवाई करून त्यांच्यावर जरब बसवा, असे आदेश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.
स्वारगेट पोलिस ठाण्याच्या आवारात सुरू करण्यात आलेल्या बालस्नेही कक्षाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते.
पुणे शहराची लोकसंख्या वाढत चालली आहे. नोकरी, रोजगाराच्या शोधात शहरात येणाऱ्या नागरिकांची माहिती पोलिसांकडे नाही. शहरात गुन्हेगारी घटना वाढत आहेत. गुन्हेगारांना जरब बसविण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करावेत. गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाल्यास त्यांच्यावर जरब बसेल.