कोरोना काळातील गुन्हे मागे घेणार : आयुक्त रितेश कुमार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोना काळातील गुन्हे मागे 
घेणार : आयुक्त रितेश कुमार
कोरोना काळातील गुन्हे मागे घेणार : आयुक्त रितेश कुमार

कोरोना काळातील गुन्हे मागे घेणार : आयुक्त रितेश कुमार

sakal_logo
By

पुणे, ता. ७ : सामाजिक, राजकीय आंदोलनात कार्यकर्त्यांवर दाखल झालेले राजकीय गुन्हे मागे घेण्यात यावेत, अशी मागणी कॉँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडे केली. त्यास पोलिस आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत आगामी तीन महिन्यात राजकीय गुन्हे मागे घेण्यात येतील, असे आश्वासन दिले.

काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने शनिवारी पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची भेट घेतली. यावेळी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी, माजी राज्यमंत्री रमेश बागवे, संजय बालगुडे, विरेन्द्र किराड, माजी नगरसेवक रवींद्र धंगेकर, अविनाश बागवे, रमेश अय्यर आदी उपस्थित होते.

कोरोना कालावधीत नागरिकांवर व राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांवर दाखल झालेले गुन्हे राज्य शासनामार्फत शासन निर्णय (जीआर) प्रमाणे परिमंडळ उपयुक्तांमार्फत समिती गठीत करून त्वरित निर्णय घेण्यात यावा अशी मागणी केली. राज्य सरकारने या संदर्भात आदेश दिले असले तरी पुणे पोलिसांनी अद्याप सामाजिक, राजकीय गुन्हे मागे घेतलेले नाहीत असे शिष्टमंडळाने आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले.पोलिस आयुक्तांनी त्याबाबत सकारात्मक विचार करू असे संगत पुढील तीन महिन्यात राजकीय, सामाजिक गुन्ह्यांची पडताळणी करून योग्य कारवाई करण्यात येईल असे सांगितले.

पोलिस आयुक्तालय, पुणे : पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने शनिवारी भेट घेत त्यांना निवेदन दिले. यावेळी (डावीकडून रमेश अय्यर, अविनाश बागवे, रवींद्र धंगेकर, रमेश बागवे, रितेश कुमार, मोहन जोशी, वीरेंद्र किराड व संजय बालगुडे