विद्यापीठाच्या अधिसभेवर अध्यापकांच्या गटामधून सदस्य पदाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यापीठाच्या अधिसभेवर अध्यापकांच्या गटामधून सदस्य पदाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर
विद्यापीठाच्या अधिसभेवर अध्यापकांच्या गटामधून सदस्य पदाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर

विद्यापीठाच्या अधिसभेवर अध्यापकांच्या गटामधून सदस्य पदाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर

sakal_logo
By

पुणे, ता. १० : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेवर अध्यापकांच्या गटामधून सदस्य पदाच्या निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. यांसह विद्यापरिषदेवर सहा प्रतिनिधी आणि विद्यापीठाच्या विविध अभ्यास मंडळांवर महाविद्यालयाच्या विभाग प्रमुखांमधून तीन विभाग प्रमुख निवडून देण्यासाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे.
विद्यापीठाच्या अधिसभेवर अध्यापक गटातून सदस्य म्हणून डॉ. नीता मोहिते, डॉ. सुनील लोखंडे, डॉ. चिंतामण निगळे, डॉ. सचिन शिरसाट, डॉ. संदीप पालवे, डॉ. समीर भोसले, डॉ. बाबासाहेब सागडे, डॉ. धोंडिराम पवार, डॉ. हर्ष गायकवाड, डॉ. रमेश गायकवाड हे निवडून आले आहेत. यासाठी विद्यापीठ विकास मंच आणि अध्यापक संघटना प्राचार्य फोरम अशी एकत्र ही निवडणूक लढवली होती. तसेच अध्यापकांच्या गटाने त्यांच्यामधून डॉ. राजेंद्र घोडे, डॉ. करिष्मा परदेसी, डॉ. हर्ष जगझाप यांची अधिसभा सदस्य म्हणून निवड झाली आहे.

विद्यापरिषदेवर प्रतिनिधींची निवड
विद्यापीठ अध्यापकांच्या गटाने त्यांच्यामधून विद्यापरिषदेवर प्रत्येक विद्याशाखेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दोन सदस्य पदाच्या निवडणुकीचा निकालही जाहीर करण्यात आला. त्यानुसार विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेवर डॉ. संगीता जगताप, डॉ. कैलास कापडणीस यांची, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेवर डॉ. सुधाकर जाधवर, डॉ. पराग काळकर यांची, तर मानवविज्ञान विद्याशाखेवर डॉ. तुकाराम रोंगटे, डॉ. वीणा नारे यांची आणि आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेवर डॉ. मोहन कांबळे, डॉ. राजश्री जायभाये यांची निवड झाली आहे, अशी माहिती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी दिली.