शहरात आठवडाभर गारठा जाणवणार

शहरात आठवडाभर गारठा जाणवणार

पुणे, ता. ५ ः शहरात गेल्या दोन दिवसांपासून किमान तापमानाचा पारा दहा अंशांच्या दरम्यान कायम आहे. पुढील आठवडाभर शहरात गारठ्याची स्थिती कमी अधिक प्रमाणात कायम राहण्याची शक्यता हवामान शास्त्र विभागाने वर्तवली आहे.

रविवारी (ता. ५) जिल्ह्यात पाषाण येथे सर्वाधिक कमी १०.३ अंश सेल्सिअस किमान तापमान होते. तर शहरात १०.९ अंश सेल्सिअस किमान तापमानाचा किमान तापमानाची नोंद झाली. सरासरीपेक्षा तापमानातील घट कायम आहे. त्यामुळे रात्री आणि पहाटे गारठा अधिक जाणवू लागला आहे. तसेच पहाटेच्या वेळी धुक्याची स्थितीदेखील पाहायला मिळत आहे. हवामान शास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील आठवडाभर शहरातील तापमान हे दहा ते बारा अंश सेल्सिअस दरम्यान पाहायला मिळेल. त्यामुळे थंडी कायम राहू शकते.

राज्यातही थंडीचे चित्र असेच पाहायला मिळत आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे. रविवारी राज्यातील निचांकी तापमानाची नोंद निफाड येथे ८.१ अंश सेल्सिअस झाली. किमान तापमानात घट झाल्याने उत्तर महाराष्ट्र गारठला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत एक ते पाच अंशांनी घट नोंदली गेली. सध्या श्रीलंकेच्या पश्चिम किनाऱ्यालगत असलेले कमी दाबाचे क्षेत्र ओसरले आहे. तर उत्तर भारतातील राज्यात थंडी कमी झाली आहे. दरम्यान सोमवारी (ता. ६) उत्तराखंड, पंजाबमध्ये तुरळक ठिकाणी दाट धुके पडण्याची शक्यता असून ईशान्येकडील काही राज्यांमध्ये गारपीट आणि विजांसह पावसाची इशारा देण्यात आला आहे.

येथे गारठा अधिक (आकडेवारी सेल्सिअसमध्ये) :
निफाड - ८.१
धुळे - ८.६
औरंगाबाद - ९.२
जळगाव - १०.०
पाषाण - १०.३
पुणे - १०.९
हवेली - १०.४

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com