Sun, March 26, 2023

राष्ट्रीय मराठा पक्षही
पोटनिवडणुकीच्या रिंगणात
राष्ट्रीय मराठा पक्षही पोटनिवडणुकीच्या रिंगणात
Published on : 6 February 2023, 4:44 am
पुणे, ता. ६ : राष्ट्रीय मराठा पक्ष कसबा आणि पिंपरी विधानसभेची पोटनिवडणूक लढवणार आहे. कसबा मतदार संघातून रविंद्र वेदपाठक आणि पिंपरीमधून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अंकुशराव पाटील-होनाळीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण, शेती मालाला हमीभाव, सुशिक्षितांना रोजगार, पिक विमा यासारख्या प्रश्नांवर विधानसभेत आवाज उठवला जावा, यासाठी राष्ट्रीय मराठा पक्षातर्फे कसबा आणि पिंपरी विधानसभेची पोटनिवडणूक लढवण्यात येत असल्याची माहिती पक्षाचे शहर व जिल्हाध्यक्ष रविंद्र वेदपाठक यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी डॉ. प्रेमानंद वाघमारे, सुनिल गायकवाड, अंकुश बिरादार-सावरगावकर, पांडुरंग बिरादार आदी उपस्थित होते.