व्यावसायिकाला धमकावून खंडणी उकळणारा अटकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

व्यावसायिकाला धमकावून 
खंडणी उकळणारा अटकेत
व्यावसायिकाला धमकावून खंडणी उकळणारा अटकेत

व्यावसायिकाला धमकावून खंडणी उकळणारा अटकेत

sakal_logo
By

पुणे, ता. १२ : लक्ष्मी रस्त्यावरील एका कपडे विक्री करणाऱ्या व्यावसायिकाला धमकावून खंडणी उकळणाऱ्यास अटक करण्यात आली आहे. रवींद्र पिरप्पा कांबळे (वय ३६, रा. बुधवार पेठ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी कांबळेचे साथीदार आकाश कासट, जमीर कदम यांच्यासह साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत २८ वर्षीय व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा कपडे विक्रीचा व्यवसाय आहे. त्याने आरोपींकडून सात लाख रुपये व्याजाने घेतले होते. त्या बदल्यात व्यावसायिकाने आरोपींना एकूण १३ लाख ६२ हजार रुपये परत केले होते. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीकडे १३ लाख ५० हजारांची मागणी केली. पैसे न दिल्यास व्यावसायिक आणि त्याच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली. व्यावसायिकाने याबाबत खंडणी विरोधी पथक एकचे पोलिस निरीक्षक अजय वाघमारे यांच्याकडे तक्रार अर्ज दिला होता. त्यानंतर खंडणी विरोधी पथकाने कारवाई करून कांबळे याला अटक केली असून त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे. अतिरिक्त पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अजय वाघमारे, सहायक निरीक्षक अभिजित पाटील, मधुकर तुपसौंदर, हेमा ढेबे आणि रवींद्र फुलपगारे यांनी ही कारवाई केली.

माथाडी संघटनेच्या नावाखाली मागितली खंडणी :
काच विक्री व्यापाऱ्याकडे माथाडी संघटनेच्या नावाखाली खंडणी मागणाऱ्यास खंडणी विरोधी पथकाने अटक केली. अविनाश दिलीप अडागळे (वय ३२, रा. वारजे) असे अटक आरोपीचे नाव आहे. व्यापाऱ्याकडे आलेल्या टेम्पोतील काचा उतरविण्यासाठी अडागळेने खंडणीची मागणी केली होती. व्यापाऱ्याने तक्रार दिल्यानंतर पोलिस निरीक्षक अजय वाघमारे आणि पथकाने अडागळेला अटक केली.