फडणवीस यांची व्यापारी, 
मंडळांच्या प्रतिनिधींशी चर्चा

फडणवीस यांची व्यापारी, मंडळांच्या प्रतिनिधींशी चर्चा

पुणे, ता. १५ : कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या संदर्भात महत्त्वाच्या बैठका घेण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी पुण्यात आले होते. डेक्कन येथील सावरकर भवन येथे फडणवीस यांनी एक बैठक घेतली. त्यानंतर रात्री आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या निवासस्थानी शहरातील व्यापारी, उद्योगपती, कसब्यातील प्रमुख गणपती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.

कसबा विधानसभा मतदारसंघात लक्ष्मी रस्ता, रविवार पेठ, गुरुवार पेठ, बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता या शहरातील प्रमुख बाजारपेठा आहेत. व्यापारी, ग्राहक यांच्या समस्या काय आहेत. त्यावर चर्चा करून, सुधारणा करणे तसेच राज्य व केंद्र सरकारच्या पातळीवरील समस्या सोडविण्याच्यादृष्टीने व्यापारी, उद्योगपतींनी त्यांची भूमिका या वेळी मांडली.

यामध्ये पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका व सचिव महेंद्र पितळिया यांनी पगारावरील प्रोफेशनल टॅक्स रद्द करावा, शहरातील होलसेल व सेमी होलसेल मार्केटसाठी सोयिस्कर जागा उपलब्ध करून द्यावी. शहरातील ४७८ झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन या संदर्भात महासंघाने दिलेल्या प्रस्तावाचा विचार करावा या मागण्या केल्या. या प्रसंगी क्रीडामंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्यासह शहर भाजपमधील इतर प्रतिनिधी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com