कात्रज- कोंढवा भागातील पाणीपुरवठा शनिवारी बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कात्रज- कोंढवा भागातील
पाणीपुरवठा शनिवारी बंद
कात्रज- कोंढवा भागातील पाणीपुरवठा शनिवारी बंद

कात्रज- कोंढवा भागातील पाणीपुरवठा शनिवारी बंद

sakal_logo
By

पुणे, ता. २२ : महापालिकेच्या समान पाणीपुरवठा योजनेसाठी कोंढवा बुद्रुक येथील
केदारेश्वर साठवण टाकी व कात्रज येथील महादेव मंदिर साठवण टाक्यांमध्ये येणारे पाणी
मोजण्यासाठी राजीव गांधी पंपिंग स्टेशन कात्रज जलवाहिनीवर फ्लो-मीटर बसविण्यात येणार आहे. त्यामुळे शनिवारी (ता. २५) कात्रज- कोंढवा परिसरातील पाणीपुरवठा बंद असणार आहे. रविवारी (ता. २६) कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.

पाणीपुरवठा बंद असणारा भाग पुढीलप्रमाणे :
कात्रज गावठाण, गुजरफाटा, निंबाळकर वस्ती, उत्कर्ष सोसायटी, भूषण सोसायटी, ओमकार
सोसायटी, राजस सोसायटी, वरखडेनगर, माऊलीनगर, शिवशंभोनगर, गोकुळनगर, सुखसागर नगर भाग-१ व २, साईनगर, गजानननगर, काकडे वस्ती, गंगाधाम शत्रुंजय रस्ता, कात्रज-कोंढवा रस्ता, टिळेकरनगर येवलेवाडी, कोंढवा बुद्रुक गावठाण, श्रद्धानगर, पुण्यधाम आश्रम रस्ता, तालाब कंपनी परिसर, लक्ष्मीनगर, आंबेडकरनगर, खडीमिशन परिसर, बधेनगर, येवलेवाडी मुख्य रस्ता, राजीव गांधीनगर, अप्पर इंदिरानगर परिसराचा काही भाग.