
चुकवू नये असे काही
१) महिला कलाकारांच्या कलांचे प्रदर्शन
महिला दिनाचे औचित्य साधत आर्ट पुणे फाउंडेशनतर्फे व्हॉइस ऑफ रेसिलिएन्स’ या विशेष प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात देशभरातील ३० प्रसिद्ध महिला कलाकारांच्या कलांचे प्रदर्शन पाहण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये त्यांची चित्रे, मूर्ती, टेराकोटा क्ले मॉडेल्स, लाकडी वस्तू, पेपर कोलाज वर्क आदी कलाकृतींचा समावेश असेल.
कधी : बुधवार (ता. ८) ते रविवार (ता. १२)
केव्हा : सकाळी ११ ते सायं ६
कुठे : राजा रवि वर्मा कलादालन, घोले रस्ता
२) ‘हीलिंग हार्मनी’
आस्था फाउंडेशन प्रस्तुत आणि कलांगण चॅरिटेबल ट्रस्टतर्फे ‘हीलिंग हार्मनी’ या डॉक्टर आणि पेशंट यांनी एकत्रितपणे सादर केलेल्या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कर्करोगावर मात करून २० ते २५ वर्षे आपले आयुष्य हसत खेळत जगणाऱ्या महिला व प्रख्यात कर्करोगतज्ज्ञ डॉ. शेखर कुलकर्णी कार्यक्रमाचे सादरीकरण करणार आहेत. यावेळी हिंदी-मराठी गीते, आरोग्यदायी सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या गप्पा आणि विविध अनुभव मांडण्यात येणार आहेत.
कधी : गुरुवार (ता. ९)
केव्हा : सायंकाळी ६ वाजता
कुठे : यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड
३) महिला गझलकारांचा ‘गझलरंग’
गझलसम्राट सुरेश भट स्मृतीदिन आणि जागतिक महिला दिनानिमित्त सुरेश भट गझलमंच, पुणे यांच्यातर्फे ‘गझलरंग’ या महिला गझलकारांच्या मराठी-उर्दू गझल मुशायराचे आयोजन करण्यात आले आहे. मनिषा नाईक, ज्योत्स्ना रजपूत, कीर्ती वैराळकर-इंगोले, विजयालक्ष्मी वानखेडे, स्वाती शुक्ल आदी गझलकार यात सहभागी होणार आहेत.
कधी : शनिवार (ता. ११)
केव्हा : सायंकाळी ६.३० वाजता
कुठे : एस. एम. जोशी सभागृह, नवी पेठ
४) ‘पोस्टर’ चित्रप्रदर्शन
सामाजिक आणि ज्वलंत विषयांवर प्रबोधन करणाऱ्या ‘पोस्टर’ या कलाप्रकाराचा अनोखा चित्राविष्कार सादर करणाऱ्या चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात अभिनव कला महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक डॉ. मिलिंद फडके लिखित ‘पोस्टर’ या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात येणार आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन लेफ्टनंट जनरल विनायक पाटणकर (निवृत्त) यांच्या हस्ते होईल.
कधी : रविवार (ता. १२) ते गुरुवार (ता. १६)
केव्हा : सकाळी १०.३० ते सायंकाळी ८
कुठे : बालगंधर्व कलादालन, जंगली महाराज रस्ता