Sat, April 1, 2023

पीईएस मॉडर्नच्या विद्यार्थिनींचा मेळावा
पीईएस मॉडर्नच्या विद्यार्थिनींचा मेळावा
Published on : 10 March 2023, 9:27 am
पुणे, ता. १० : पीईएस मॉडर्न गर्ल्स हाय स्कूलच्या १९७३च्या बॅचच्या विद्यार्थिनींचे सुवर्ण महोत्सवी स्नेहसंमेलन नुकतेच संपन्न झाले. याच बॅचमधील प्रख्यात हृदयरोग तज्ज्ञ डॉ. जगदीश हिरेमठ यांचे साठीनंतरचे दैनंदिन जीवनाबाबत केलेले मार्गदर्शन उल्लेखनीय ठरले. जीवनातील सर्व तणाव बाजूला ठेऊन सर्वांनी यावेळी मनमुराद आनंद लुटला. असेच सोनेरी क्षण पुन्हा पुन्हा यावेत, अशा अपेक्षा यावेळी उपस्थितांनी व्यक्त केल्या.