‘भारती’च्या माजी विद्यार्थी संघटनेचा मेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘भारती’च्या माजी विद्यार्थी संघटनेचा मेळावा
‘भारती’च्या माजी विद्यार्थी संघटनेचा मेळावा

‘भारती’च्या माजी विद्यार्थी संघटनेचा मेळावा

sakal_logo
By

पुणे, ता. १० : भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अॅल्युम्नी असोसिएशनतर्फे माजी विद्यार्थी संघटनेचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. याचे उद्‌घाटन अन्न व औषध प्रशासनाच्या पुणे विभागाचे सहआयुक्त श्याम प्रतापवार यांच्या हस्ते झाले. संघटनेचे अध्यक्ष प्रसन्न पाटील या वेळी उपस्थित होते. उपप्राचार्य पोपट जाधव यांचा फार्मसी क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या निमित्ताने प्रा. प्रवीण जावडे व प्रा. सुनील बाकलीवाल लिखित ‘फार्मसी रिक्रुटमेंट एक्झाम’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच, एकपात्री कलाकार मकरंद टिल्लू यांच्या ‘जगण्यासाठी हसा आणि हसण्यासाठी जगा’ या कार्यक्रमाचे सादरीकरण झाले. या वेळी प्रा. डॉ. एच. एम. कदम, डॉ. बी. एस. कुचेकर, डॉ. ए. व्ही. यादव, डॉ. विलासराव कदम, डॉ. एच. एन. मोरे आदी उपस्थित होते.