‘नात्यांच्या पलीकडे’ लघुपटाला पारितोषिक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘नात्यांच्या पलीकडे’ लघुपटाला पारितोषिक
‘नात्यांच्या पलीकडे’ लघुपटाला पारितोषिक

‘नात्यांच्या पलीकडे’ लघुपटाला पारितोषिक

sakal_logo
By

पुणे, ता. १० : अवयव दान या विषयावर आधारित असलेल्या ‘नात्यांच्या पलीकडे’ या लघुपटाला पारितोषिकाने गौरविण्यात आले. मूत्रपिंड दिनानिमित्त नर्मदा किडनी फाउंडेशनतर्फे दादर येथे आयोजित कार्यक्रमात पारितोषिक वितरित करण्यात आले.
छायाचित्रकार नीलेश गोपाळ पारगावकर यांनी हा लघुपट दिग्दर्शित केला आहे. सीमा दिवेकर यांनी अभिनय केला असून, राजलक्ष्मी मोरे यांनी यात दिग्दर्शनासाठी सहकार्य केले. एका सत्य घटनेच्या आधारावर या लघुपटाची निर्मिती केली आहे. आधुनिक काळात विविध कारणांनी हृदय, मूत्रपिंड, यकृत, फुफ्फुस अशा अवयवांचे कार्य थांबते. तो अवयव प्रत्यारोपित करणे इतकाच पर्याय रुग्णांपुढे असतो. या अवयवांच्या प्रतीक्षा यादीवरील रुग्ण दरवर्षी वाढत आहेत. मात्र, त्या प्रमाणात अवयव दाते पुढे येत नाहीत. त्यासाठी अवयव दानाबाबत जनजागृतीची गरज आहे. वेगवेगळ्या कारणांनी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार घेणाऱ्या रुग्णांचे मेंदूचे कार्य थांबते. त्याला वैद्यकीय परिभाषेत ‘ब्रेन डेड’ म्हटले जाते. अशा रुग्णाच्या नातेवाइकांना अवयव दानाचे महत्त्व शास्त्रीय पद्धतीने सांगितले पाहिजे. त्यातून नातेवाईक रुग्णाच्या अवयव दानात परवानगी देतील. त्यामुळे गरजू रुग्णांना अवयव मिळून त्यांचे प्राण वाचविणे शक्य होणार असल्याचा संदेश या लघुपटातून देण्यात आला आहे.